IDBI Recruitment 2024 Saam Tv
naukri-job-news

IDBI Recruitment 2024 : बँकेत अधिकारी व्हायचंय? 50 जागांसाठी निघाली जाहिरात, शैक्षणिक पात्रता काय? जाणून घ्या...

IDBI Recruitment 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. ५० हून अधिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सध्या आयडीबीआय बँकेत भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत बँकेने अधिसूचना जाहीर केली आहे. (IDBI Bank Recruitment)

IDBI बँकेत तब्बल ५० जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया लवकरात लवकर सुरु होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.

या नोकरीसाठी एकूण ५६ पदे भरती केली जाणार आहेत. यात २५ पदे ही असिस्टंट जनरल (AGM) ग्रेड सी आणि ३१ पदे ही ग्रेड बीसाठी आहेत. एजीएम ग्रेड सीसाठी उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे तर मॅनेजर ग्रेड बीसाठी उमेदवार ग्रॅज्युएट असायला हवा. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला इतर ठिकाणी कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. (Bank Job)

या नोकरीसाठी २० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मॅनेजरसाठी उमेदवाराचे वय २५ ते ३५ वर्ष असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १ हजार शुल्क भरावे लागणार आहे.तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी लिंक १ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. १५ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही www.idbibank.in वर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT