HCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

HCL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार पगार १.२० लाख रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

HCL Recruitment 2025: सरकरी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

१३ विभागात काम करण्याची संधी

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. तुमच्याकडे सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड कंपनीत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. मायनिंग, ज्यूलॉजी, इलेक्ट्रिकल, सिविलसह १३ विभांगामध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमधील या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. इच्छुकांनी www.hindustancopper.com वर जाऊन अर्ज करायला हवे.

एचसीएल सुपरवायजरी ग्रेड अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. यामध्ये ज्युनिअर मॅनेजर (E0 ग्रेड) वर नियुक्ती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

शैक्षणिक पात्रता

मायनिंग, ज्युलॉजी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिविल फील्डमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. याचसोबत इनवायरमेंट, मिनरल प्रोसेसिंग, मटेरियल कॉन्ट्रॅक्टमध्ये बॅचलर डिग्री प्राप्त करु शकतात.

फायनान्ससाठी सीए पदवीप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. एचआर आणि अॅडमिन पदासाठी ग्रॅज्युएट आमि ५ वर्षांचा अनुभव असावा.या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

पगार

या नोकरीसाठी निवड झाल्यावर ३०,००० ते १,२०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होणार आहे. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर नियुक्ती केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.hindustancopper.com या वेबसाइटवर जायचे आहे.

यामध्ये करिअर सेक्शनवर जावे. तिथे Apply Online वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचे आहे.

यानंतर बेसिक माहिती भरायची आहे. यानंतर फोटो आणि सही अपलोड करायची आहे.

अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आउट काढून ठेवायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणात मोठा भूकंप! शिंदेसेना आणि काँग्रेसची युती, एकाच बॅनरवर झळकले एकनाथ शिंदे, राहुल आणि सोनिया गांधीचे फोटो

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित दादांसमोर शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी वजनावरून मांडली व्यथा

निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार; मनसे नेत्याच्या फोटोसमोर बंगाली नाव, तर बहिणीचा बदलला धर्म

Maharashtra Politics : महायुती २ डिसेंबरनंतर फुटणार? भाजपच्या रवींद्र चव्हाणांच्या विधानाने चर्चांना उधाण, VIDEO

Farm Land: भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचं?

SCROLL FOR NEXT