HSSC Recruitment 2024 SAAM TV
naukri-job-news

HSSC Recruitment 2024 : पोलीस कॉन्स्टेबल होण्याची सुवर्णसंधी, तब्बल ६००० जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

Shreya Maskar

काही दिवसांपूर्वी हरियाणा पोलिसांनी ६००० कॉन्स्टेबल पदांसाठी भरती जाहीर केली होती. आता पुन्हा एकदा या पदासाठी अर्ज करण्याची लिंक उघडण्यात आली आहे. पात्र उमेदवार पुन्हा एकदा या भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने या भरतीसाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या भरती अंतर्गत एकूण ६००० कॉन्स्टेबल पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. यांपैकी ५००० पदे पुरुषांसाठी तर १००० पदे महिलांसाठी रिक्त आहेत. त्यामुळे पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. ही पदे 'गट क' साठी आहेत. ही पदे गट क च्या कॉमन एलिजिबिलिटी टेस्टमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांमार्फत भरली जातील.

या पदासाठी १८ ते ३५ वर्षे वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. निवड परीक्षा पीईटी, सीईटी, लेखी परीक्षा, पीएमटी आणि वैद्यकीय चाचणी अशा टप्प्यांमध्ये घेतली जाईल.

२९ जूनला ही लिंक पुन्हा उघडण्यात आली आहे. तर ८ जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी तुम्हाला हरियाणा कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइट hssc.gov.in/ भेट द्यावी लागेल. या पदावर नियुक्त झाल्यास उमेदवारांना २१,९०० ते ६९,१०० रुपये मासिक वेतन मिळेल. अर्ज करण्यासाठी हरियाणा कर्मचारी निवड आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. होमपेजवरील हरियाणा पोलिस कॉन्स्टेबल २०२४ नावाच्या लिंकवर क्लिक करून उपलब्ध असलेला अर्ज भरा, कागदपत्रे अपलोड करून फॉर्म सबमिट करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज धाडसाने अनेक गोष्टी कराल, नको ती जबाबदारी अंगावर येऊन पडणार; वाचा आजचे राशीभविष्य

IND-W vs NZ -W: टीम इंडियाच्या फलंदाजांचा फ्लॉप शो! पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव

Pune News: पुण्याचं बदलापूर होतंय, वाचा स्पेशल रिपोर्ट...

MIM महाविकास आघाडीत सहभागी होणार? कोणत्या भागातून मागितल्या जागा? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घ्या, एसआयटी रद्द करा; काँग्रेस आमदारांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT