BSNL Recruitment Saam Tv
naukri-job-news

BSNL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार ५० हजार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

BSNL Recruitment 2026: बीएसएनएलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी कंपनीत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

BSNL मध्ये नोकरीची संधी

विविध पदांसाठी भरती सुरु

या नोकरीसाठी मिळणार ५० हजार रुपये पगार

चांगल्या कंपनीत नोकरी करायची अनेकांची इच्छा असते. तुम्हीही जर नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारत सरकारची कंपनी बीएसएनएलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारत संचार निगम लिमिटेडमध्ये काम करु शकणार आहात. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

बीएसएनएलमध्ये सीनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी फ्रेशर्सदेखील अर्ज करु शकतात. तुम्हाला अधिकृत वेबसाइट bsnl.co.in जाऊन अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च आहे. फॉर्ममध्ये काही बदल करायचे असतील तर त्याची अंतिम तारीख १५ मार्च आहे. या नोकरीसाठी १२० पदे भरती केली जाणार आहे.

बीएसएनएलमधील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा २९ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे. लेखी परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड मल्टीपल चॉइस ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्नांची असणार आहे. यानंतर मेरिट लिस्ट आणि कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४,९०० ते ५०,५०० रुपये पगार मिळणार आहे.

बीएसएनएलमधील या नोकरीसाठी अर्ज करताना पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. टेलिकॉमन ऑपरेशन्स पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/कॉप्यूटर साइंस/इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन में बॅचलर ऑफ इंजीनियरिंग/बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी पदवी प्राप्त केलेली असावी. तर फायनान्समधील पदांसाठी चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटसी पदवी प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT