Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; महिना पगार ८८०००; अशा पद्धतीने करा अर्ज

UIIC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेड या कंपनीत विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

चांगल्या कंपनीत जास्त पगाराची नोकरी मिळावी, असे प्रत्येक तरुणाला वाटत असते. जर तुम्हालाही सरकारी नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेड या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडमध्ये अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स लिमिटेडमधील या भरतीसाठी उमेदवारांनी uiic.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. १५ ऑक्टोबर २०२४ म्हणजे आजपासून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ नोव्हेंबर २०२४ आहे.या नोकरीबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही भारत सरकारची विमा कंपनी आहे. या कंपनीत रिस्क मॅनेजमेंट, फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट, लीगल डिपार्टमेंट अशा ६ विभागात ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बीई/बीटेक / कॉमर्स/ लॉ या विषयात बॅचलर डिग्री किंवा मास्टर्स डिग्री प्राप्त असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. याबाबत अधिसूचना वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आली आहे. (Government Job)

या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३० वयोगटात असावे. या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ८८००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी परिक्षेची तारीख १४ डिसेंबर २०२४ आहे. (UIIC Recruitment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Flood : माढ्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा उध्वस्त; सीना नदीच्या महापुरात नुकसान

Paracetamol safety: गरोदर महिलांसाठी पॅरासिटोमोल किती सुरक्षित? WHO आणि AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Death : क्रीडा विश्वावर शोककळा; स्टार खेळाडूचे वयाच्या २१ व्या वर्षी निधन, मॅचदरम्यान झाली होती दुखापत

शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार? PM मोदी आणि CM फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली? VIDEO

Supreme Court : पालकांचा सांभाळ करत नसाल तर संपत्तीतून होणार बेदखल; काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT