लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे
Hake vs Jarange Patil saam

Maharashtra Politics : आम्ही भुजबळांची नाटक कंपनी तर तुझी कुठली तमाशा कंपनी? लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना पलटवार

Laxman Hake Criticized Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना भुजबळांची नाटक कंपनी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून आता लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर पलटवार केलाय.
Published on

अक्षय शिंदे, साम टीव्ही जालना

राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. दरम्यान आम्ही जर भुजबळांची नाटक कंपनी असेल, तर तुझी कुठली तमाशा कंपनी आहे? असा थेट सवाल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना केलाय.

तू एकनाथ शिंदे यांचा तमाशा आहे का? तुझ्या तमाशात फक्त नौटंकी आहे. एखाद दोन चापट मारली असेल तेवढं सहन करायचं ना. जरांगे 'आपलं ते बाब्या आणि दुसऱ्याच ते कारट' असं आता बंद ( OBC Protest Laxman Hake) करा, असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केलाय. तुम्ही लिगल मार्गाने ओबीसीत येऊ शकता. तुम्हाला कोणी सांगितलं येऊ शकत नाही, असं देखील हाके यांनी विचारलं आहे.

मनोज जरांगे यांच्यावर पलटवार

एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर राज्य मागासवर्ग आयोग असतो. तुम्ही लिगल मार्गाने ओबीसीत येऊ शकता. त्यासाठी तुम्हाला राज्य मागास आयोगाला मागासलेपण सिद्ध करावे (Manoj Jarange Patil) लागेल. चार आयोगाने मराठा समाजाचं मागसलेपण नाकारलं आहे. कोकणातला कुणबी सामाजिकदृष्ट्या मागास आहे. कोकणातल्या कुणबींचे पाहुणे- रावळे तामिळनाडू आणि गोव्यामध्ये एसीमध्ये येतात.

 लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे
Manoj Jarange : सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा

हाकेंनी काय इशारा दिला?

जे चाललंय ते, बेकायदेशीर चाललंय. आम्ही आता जशास तसं, उत्तर द्यायचं ठरवलं आहे. पडळकर माझे सहकारी मित्र आहे, प्रकाश शेंडगे माझे नेते आहे. त्यांची भूमिका हीच आहे. जरांगे तुम्ही धनगरांना टार्गेट करू (Reservation Issue) नका. आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे माणस आहोत. धनगरांचा रोष तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा हाकेंनी दिलाय.

जरांगे तुम्ही धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना टार्गेट केलंय. निदान सल्ला घेऊन बोलत जा. जरांगेंना खरंच काही कळत नाही. पडळकर आणि शेंडगेंना माझं आव्हान कसं असू शकतं? जरांगे तुम्ही संभाजी राजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल खाजगीमध्ये काय बोलतात, हे महाराष्ट्रसमोर आणण्याची वेळ आणू नका, असा गंभीर इशारा हाकेंनी दिलाय.

 लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य होणार? मुंबईत मध्यरात्री जोरदार हालचाली, नेमकं काय घडतंय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com