Manoj Jarange Patil Hunger Strike : मनोज जरांगे पाटील सगेसोयरेचा अध्यादेश आणि हैदराबाद गॅझेटसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी शनिवारी उपचार घेतले, तरी प्रकृती खालवत चालली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. शनिवारी जालन्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज आमनेसामने आले होते. तणावग्रस्त वातावरण आता निवळले आहे. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशाराच दिलाय. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार, असे म्हणज जरांगे पाटील यांनी इशारा दिला.
मी रोज मराठा समाजाला शांततेच आवाहन करतोय. पण तसे समोर पण पाहिजे. ओबीसी मराठा नाव देऊ नका. मराठा ओबीसीच्या अंगावर जात नाही, ओबीसी मराठ्यांच्या अंगावर येत नाही.
तिथं भुजबळाने लावलेले नाटक कंपनी आहे. हे ओबीसीसाठी लढत नाहीत. हे फक्त भांडण खेळण्यासाठी आहे. ते तीन वेळेस आंतरवाली सराटीत रॅली काढायला आले. आमच्या उरावर आलेत आम्ही काही बोललो का? असा सवाल मनोज जरांगेंनी उपस्थित केला.
काल छत्रपतींचा झेंडा फाडण्यात आलाय. मराठ्यांच्या पोरांना हाणण्यात आलं. आता हा जातिवाद नाही का? ते म्हणाले शाळेपर्यंत जातीवादी गेला आणि कळवळा राज ठाकरेंना आला. जे म्हणतात ना मराठे जातीवाद करतात, आमचा रस्ताच बंद केलाय. हे जर आम्ही केलं असते तर म्हणले असते मराठ्यांनी वाळीत टाकलं.
आम्ही जर रस्ता बंद केला असता तर छगन भुजबळाने थयथयाट केला असता. मराठ्यांच शोषण सुरू केलं आहे. आमचे गावबंद केले आहे. हे जर आम्ही केलं असतं तर म्हणले असते मराठ्यांनी लोकांना वाळीत टाकलं. हे जर मराठ्यांनी केलं असतं तर तेथे थयथयाट केला असता.
आमचा रस्ता बंद केला चाललो की आमच्या लोकांना हाणायला लागले. आम्ही अशी वागणूक देतो का यांना? हे आमच्या गावात रॅली घेऊन आले आमचे लोक घरात शांत राहिले. हा राज्य महामार्ग कोणाच्या बापाची जहागिरी आहे का?
आम्ही रस्ता बंद केला असता तर छगन भुजबळ म्हणाले असते झुंडशाही आहे. आमच्या लोकांना तिथं मारलं सुरवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार, असा इशारा जरांगेंनी दिला.
मला दोन चार दिवसात अंमलबजावणी पाहिजे. मराठावर अन्याय चालला आहे. हे थांबवावे सहनशक्ती संपली तर विषय खल्लास. मराठ्यांनी थोडं शांत रहाव शेवट करू, असेही जरांगे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.