Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारच्या या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,४०,००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

SPMCIL Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सिक्युरिटी प्रिटिंग प्रेसमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.

Siddhi Hande

चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, अशी प्रत्येक तरुणाची इच्छा असते. तुम्हीही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे.

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशनमध्ये डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (SPMCIL Recruitment)

एसपीएमसीआयएलमध्ये नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस ही भारत सरकारची सिक्युरिटी प्रिंटिंग कंपनी आहे. या कंपनीत नोट, चेक, पासपोर्ट, सिक्युरिटी टेपर्स, स्टॉक सर्टिफिकेट, टपाल तिकीट आणि ओळखपत्र छापली जातात. त्यामुळे भारत सरकारच्या कंपनीत नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.

डेप्युटी मॅनेजर(आयटी)अॅप्लिकेशन डेव्लपरसाठी १० पदे रिक्त आहेत. डेप्युटी मॅनेजर (सायबर सिक्युरिटी), डेप्युटी मॅनेजर(आयटी), सहाय्यक व्यवस्थापक (F&A),सहाय्यक व्यवस्थापक (एचआर) अशा विविध विभागांमध्ये भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ५०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस कंपनीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी BE/B.Tech/Personal Management/IR/MSW/इंजिनियरिंग/लॉ. इ. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल, पेपर टेक्नोलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग टेक्नोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिसूचना तपासू शकता. (Government Job)

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्ष असावी. तर राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्यावर केलेल्या विधानावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis: अमित ठाकरेंना महायुतीतील भाजपचा पाठिंबा मग शिवसेनेने का दिला उमेदवार? फडणवीसांनी सांगितली राजकीय खेळी

नेपाळचा राष्ट्रीय प्राणी कोणता? नाव ऐकून तुम्हालाही होईल आनंद

Diwali Festival: दिवाळीचा फराळ महिनाभर फ्रेश ठेवण्यासाठी 'या' खास टिप्स फॅालो करा

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये आढळले बॉम्बसदृश्य वस्तूंचे अवशेष; पाईप लाईन दुरुस्तीचे काम सुरु असताना सापडले

SCROLL FOR NEXT