अनेकांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. संरक्षण संशोधण आणि विकास संस्था म्हणेजच डीआरडीओमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
DRDO डिस्टिंग्विश फेलोशिप,डीआरडीओ फेलोशिप या पदांसाठी भरती केली जाणार आहे.२१ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १५ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. (DRDO Recruitment)
डीआरडीओमधील या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरनंतर एका महिन्याच्या आत नोकरीसाठी तुम्ही अर्ज करु शकतात.
डीआरडीओमध्ये चेयर्स या पदासाठी ५ जागा रिक्त आहे. डीआरडीओ डिस्टिंग्विश फेलोशिपसाठी ११ पदे रिक्त आहेत. डीआरडीओ फेलोशिप पदासाठी १२ जागा रिक्त आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. त्यानंतर ईमेलवर अर्ज पाठवायचा आहे.
डीआरडीओमधील या भरतीसाठी सेवानिवृत्त अधिकारी किंवा सेवानिवृत्त होणारे अधिकारी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी बॅक ग्राउंट बीटेक/ बीई पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच विज्ञान, इंजिनियरिंग आणि डिग्री प्राप्त उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
डीआरडीओमधील या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज द डायरेक्टर ऑफ पर्सोनल, डीआरडीओ, संरक्षण मंत्रालय रुम नंबर २२९, डीआरडीओ भवन, राजाजी मार्ग, नवी दिल्ली ११००११ येथे अर्ज पाठवायचा आहे. तर अर्जाचा फॉर्म dte-pers.hqr@gov.in वर अर्ज करायचा आहे. (Government Job)
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साइज फोटो द्यायचा आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी चेयर्स पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १.२५ लाख रुपये मानधन मिळणार आहे. डीआरडीओ डिस्टिंग्विश फेलोशिप पदासाठी १ लाख रुपये वेतन मिळणार आहे. डीआरडीओ फेलोशिप पदासाठी ८० हजार रुपये मानधन मिळणार आहे. (DRDO Recruitment 2024)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.