Government Job
Government JobSaam Tv

Government job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३८८३ रिक्त पदांसाठी भरती; अशा प्रकारे करा अर्ज

Yantra India Limited Recruitment 2024: सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. यात्रा इंडिया लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.
Published on

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सुरक्षा मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या यंत्र ट्रेड लिमिटेड या कंपनीत भरती सुरु आहेय. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. तब्बल ३८८३ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

१०वी पास आणि आयटीआय पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

Government Job
Bank Jobs: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार थेट RBI मध्ये नोकरी; पात्रता आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

यंत्र इंडिया लिमिटेडमधील या नोकरीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी आयटीआय पास तरुणांसाठी २४९८ जागा रिक्त आहेत तर इतर पदांसाठी १३८५ जागा रिक्त आहेत.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयटीआय पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत NCVT किंवा SCVT प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावी. तसेच आयआयटी नसलेल्या पदांसाठी १० वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Yantra India Limited Recruitment)

Government Job
Government Job: सरकारी नोकरीची संधी; कोल इंडिया लिमिटेडमध्ये भरती सुरु; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला yatra india limited recruit-gov.com या साइटवर जावे लागेल. त्यानंतर लॉग इन करा. फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरुन सबमिट करा. या फॉर्मची एक प्रिंट आउट स्वतः जवळ ठेवा.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड पात्रतेनुसार केली जाणार आहे. शॉर्टलिस्ट करुन गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना ६००० ते ७००० रुपये वेतन दिले जाईल.

Government Job
Government Job: १०वी, १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; ONGC मध्ये भरती सुरु; पगार किती? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com