Government Job Google
naukri-job-news

Government Job: समाज कल्याण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; पगार १४२४०० रुपये; अर्ज कसा करावा?

Samaj Kalyan Vibagh Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारच्या समाज कल्याण विभागात भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात सध्या भरती सुरु आहे. समाज कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात तब्बल २१९ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार १५ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात.

समाज कल्याण आयुक्त पुणे येथे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी स्टेनोग्राफर, स्टेनोग्राफर टायपिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पदासाठी इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत MS CIT प्रमाणपत्र आणि कॉम्प्युटर विषयात कोर्स केलेला असावी.

समाज कल्याण निरीक पदासाठी पदवी आणि MS CIT चा कोर्स केलेला असावा. लघुलेखक म्हणजेच स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराने टायपिंगचा कोर्स केलेला असावा. (Samaj Kalyan vibagh Bharti)

या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.sjsa.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे. (Government Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT