एक चांगला करिअर (Career Tips) निवडणे आणि त्यामध्ये यशस्वी होणे हे खूप महत्वाचे आहे. १० वी १२ वी झाल्यानंतर योग्य करिअर ऑप्शन निवडणे अत्यंत महत्वाचे आहे. हा ऑप्शन निवडताना तुम्ही जर एक चूक केली तर ती तुम्हाला अडचणीत आणेल.
योग्य करिअर निवडताना तुम्हाला कोणत्या क्षेत्राची आवड आहे? तुम्ही करत असलेल्या क्षेत्राला पुढे स्कोप आहे का?या सगळ्यांचा विचार करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला १० वी आणि १२ वी नंतरचे काही शॉर्ट टर्म कोर्स (Short Term Course) सांगणार आहोत.
सध्या डिडिटल मार्केटिंग करिअरला प्रचंड स्कोप आहे. या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी तुम्ही बारावीनंतर डिप्लोमा करू शकता. यानंतर तुम्ही उच्च शिक्षण एमबीए देखील करू शकता.डिजीटल मार्केटिंग कोर्स ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमात आहे.
इंटेरिअर डिझायनिंग या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. नवनवीन संकल्पना आणि डिझाईन्सची माहिती असलेल्या या करिअरचा सध्या मोठी मागणी आहे. जर तुम्हाला क्रिएटिव्हीटी करण्याची आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकता.
१२ वी नंतर इंटेरिअर डिझायनिंगचा डिप्लोमा करू शकता. या डिप्लोमामध्ये आकर्षक आणि सर्जनशील कौशल्ये प्रदान केली जातात.
तुम्हाला क्रिएटिव्हीटी आणि कॉम्प्युटर शिकण्याची इच्छा असेल, तर व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन हा एक चांगला कोर्स करू शकता.आजच्या काळात अॅनिमेशन प्रोफेशनल्स आणि आर्टिस्टला खूप मागणी आहे. हा शॉर्ट टर्म कोर्स 5 महिन्यांचा आहे तर डिप्लोमा 3 वर्षांचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.