Career Tips
Career TipsSaam Tv

Career Tips: 12वी नंतर पुढे काय?, तुम्ही या क्षेत्रात करू शकता चांगले करिअर; काय आहे संधी घ्या जाणून!

Career News: बारावी (12th) झाली आता पुढे नक्की करायचे काय?, कोणता कोर्स करायचा? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील.
Published on

Mumbai: देशभरातल्या अनेक राज्यातील 12वी बोर्ड परीक्षेचे निकाल (12 th Result) जाहीर झाले आहेत. लवकरच महाराष्ट्र आणि सीबीएसई बोर्डाचा (CBSE Board) देखील निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशामध्ये निकाल लागण्यापूर्वीच पुढे काय करायचे याचा विचार विद्यार्थी करु लागतात. तुम्हाला देखील बारावी झाली आता पुढे नक्की करायचे काय?, कोणता कोर्स करायचा? असे अनेक प्रश्न पडले असतील.

बारावी झालेल्या आणि परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. कारण बारावीनंतर कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगले करिअर करु शकता, या क्षेत्रात नेमक्या संधी काय आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याच्या माध्यमातून तुम्हाला करिअरसाठी चांगले क्षेत्र निवडण्यास मदत होणार आहेत. तर हे क्षेत्र नेमकी कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत...

मास कम्युनिकेशन (Mass Communication) -

ज्या विद्यार्थ्यांना आसपास घडणाऱ्या घडामोडींची जाणीव आहे. तसंच त्यांना या घडामोडींबद्दल माहिती असेल, ते यावर आपले मत व्यक्त करत असतील तर त्यांच्यासाठी मास कम्युनिकेशन हा कोर्स एक चांगाला पर्याय आहे. हा कोर्स केला तर तुम्ही पत्रकारिता, जाहिरात उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातही काम करून चांगले करिअर करू शकता.

फॅशन इंडस्ट्री (Fashion industry) -

जर तुम्हाला फॅशनमध्ये रस असेल तर तुम्ही फॅशन डिझायनिंग कोर्स करू शकतात. यामध्ये स्केचेस बनवून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या टॅलेंटनुसार काम करून कपडे, शूज आणि ज्वेलरीमध्ये देखील करिअर करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही चांगल्या कॉलेजमधून फॅशन डिझायनिंगचा कोर्स करावा लागेल. हा कोर्स करुन तुम्ही चांगले करिअर करु शकता.

कोडींग (Coding) -

आजच्या काळात कोडिंग आणि डेटा याचाच खेळ सुरु आहे. जर तुम्हाला टेक्नोलॉजीची चांगली माहिती अशेल तर तुम्ही या क्षेत्रात चांगले करिअर करू शकता. यामध्ये तुम्ही घरी बसून लाखोंची कमाई करू शकता. त्यामुळे हे करिअर तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते.

फोटोग्राफी (Photography) -

बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जर तुम्हाला फोटोग्राफीमध्ये रस असेल तर तुम्ही फोटोग्राफीमध्ये करिअर करु शकता. सध्याच्या काळात वाइल्डलाइफ फोटोग्राफी ते लग्नसोहळ्यासाठी चांगल्या फोटोग्राफरची गरज असते. या क्षेत्रात जाण्यासाठी कॅमेऱ्यांबाबत चांगले ज्ञान असावे लागते. त्यासाठी तुम्ही फोटोग्राफीचा कोर्स करुन चांगले करिअर मिळवू शकता. फोटोग्राफीचा कोर्स केल्यानंतर तुम्ही मीडियामध्ये देखील नोकरी मिळवू शकता.

इव्हेंट मॅनेजमेंट (Event Management) -

इव्हेंट मॅनेजरला भारतात अनेक नोकऱ्या आहेत. जसे वेडिंग प्लॅनर, इव्हेंट कोऑर्डिनेटर, इव्हेंट प्लॅनर, इव्हेंट डायरेक्टर इत्यादी पदांसाठी नोकऱ्या आहेत. बारावीनंतर देखील तुम्ही हा कोर्स करुन नोकरी मिळवत चांगला पगार कमावू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com