CV vs Resume : नोकरीच्या शोधात आहात ? मग, CV आणि Resume मधला फरक काय ? जाणून घ्या

Difference Between a Resume and a Curriculum Vitae : सीव्ही आणि रिझ्यूम दोन्ही नोकरी क्षेत्रात उमेदवाराचा महत्त्वाचा चेहरा असतात.
CV vs Resume
CV vs ResumeSaam Tv

What is better CV or resume : खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर सर्वात महत्त्वाचा असतो तो सीव्ही आणि रेझ्युमे. याशिवाय कोणत्याही कंपनीत नोकरी मिळवणे अशक्य असते. यामागचे कारण असे की सीव्ही आणि रेझ्युमे दोन्ही नोकरी क्षेत्रात उमेदवाराचा महत्त्वाचा चेहरा असतात.

दोन्ही गोष्टी व्यायसायिक डॉक्यूमेंट्स असून यांच्या आधारेच उमेदवाराला निवडले जाते. पण बऱ्याचदा काही कंपन्या सीव्ही तर काही कंपन्या रेझ्युमे मागतात. असे का? हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? तुम्ही देखील या दोन्ही गोष्टींना एक समजून चुक करत नाही आहात ना?

CV vs Resume
Employee Advance Salary : खुशखबर! आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अ‍ॅडव्हान्स सॅलरी, जाणून घ्या सविस्तर

खरंतर, सीव्ही आणि रेझ्युमे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत आज आपण या दोघांमधला नेमका काय फरक आहे ते पाहाणार आहोत. असे अनेक लोकं आहेत जे सीव्ही आणि रेझ्युमेला एकच समजतात. चला जाणून घेऊयात यांतील फरक

1. सीव्ही (Curriculum Vitae)

सीव्ही म्हणजे कर्रक्यूलम वीटा. हा एक असा डॉक्यूमेंट आहे जो आपल्या शैक्षणिक (Education) आणि व्यावसायिक करिअरचा ओव्हरव्हूव देतो. पण सीव्हीमध्ये शैक्षणिक माहिती जरा जास्त सखोल दिलेली असते. सीव्ही अनेकदा फ्रेशर्सकडून मागितली जाते आणि यातील माहीती ही 4 पानांपर्यंत असू शकते.

CV vs Resume
Career In Fashion Designing : फॅशन सेन्सचे उत्तम नॉलेज आहे ? कसे बनवाल फॅशन डिजाइनिंगमध्ये करिअर? शिक्षणाची अट किती ? जाणून घ्या सविस्तर

तसेच यामध्ये तुम्ही काय शिक्षण घेतले आहे याबाबत संपूर्ण माहीती दिलेली असते. एकूणच सीव्ही पूर्णपणे तुमच्या शैक्षणिक गोष्टींवर आधारित असते. सीव्हीची सुरुवात नाव आणि शैक्षणिक पार्श्वभूमीपासून होते. 'कर्रक्यूलम वीटा' एक लॅटीन शब्द आहे ज्याला शॉर्ट फॉर्मंध्ये सीव्ही म्हटले जाते. ज्याचा इंग्रजी अर्थ 'कोर्स ऑफ लाइफ' असा होतो.

2. रेझ्युमे (Resume)

रेझ्युमे सीव्हीच्या उलट तुमच्या कामाचा अनुभव, कौशल्य आणि कामासंबंधित असलेली माहिती यांच्यावर आधारित असते. रेझ्युमेमध्ये शैक्षणिक क्षेत्रावर कमी भर दिलेला असतो. त्याचबरोबर यामध्ये वेतनाबद्दल देखील लिहिले जाते. रेझ्युमे हा 1 ते 2 पानांचा असतो. यामध्ये फक्त महत्त्वाच्या गोष्टीच नमूद केलेल्या असतात. त्याच बरोबर यात जॉब-अवॉर्ड्स आणि अचिव्हमेंट्स बद्दल ही माहिती दिलेली असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com