Government Job alert Saam TV
naukri-job-news

Government Job Vacancy 2024: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; २ लाख रुपये मासिक वेतन मिळणार; जाणून घ्या सविस्तर

Recruitment in Rec Power Distribution Company Limited (RECPDCL): सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडमध्ये भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालू आहे. ही पदे मानव संसाधन विभाग, कंपनी सचिवालय, कायदा, आयटी, सीएसआर या विभागांसाठी आहेत. तुम्हीही या नोकरीसाठी पात्रतेनुसार अर्ज करु शकतात.

REC पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडमध्ये एकूण २५ पदांसाठी ही भरती केली जाणार आहेत. यामध्ये डेप्युटी मॅनेजर इंजिनियरिंगसाठी ४ रिक्त पदे ठेवण्यात आली आहेत तर ऑफिसर इंजिनियरिंग पदासाठी एकूण १० रिक्त जागा आहेत.तर डेप्युटी मॅनेजर एचआरसाठी १ रिक्त पद आहे. सीएसआर विभागातही रिक्त पदांसाठी भरती सुरु आहे. ज्या उमेदवारांना या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

शैक्षणिक पात्रता

या नोकरीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.या नोकरीसाठी BE,B.Tech.CA,CMA, MBA किंवा पीजी डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी वयोमर्यादा ३९ वर्ष असणार आहे.

या पदांसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणा आहे तर ST,SC,PWBD या श्रेणीतील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. या नोकरीसाठी वेतनदेखील पदानुसार वेगवेगळे असणार आहे. डेप्युटी मॅनेजर इंजिनियरिंग पदासाठी दर महिना ७०,००० ते २,००,००० रुपये वेतन देण्यात येईल. तर मॅनेजर पदासाठी ५०,००० ते १,६०,००० रुपये मासिक वेतन दिले जाईल. डेप्युटी मॅनेजर एफएनए पदासाठी २ लाख रुपये वेतन दिले जाणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसााइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT