अनेक तरुणांची प्रोफेसर किंवा शिक्षक व्हायची इच्छा असते. त्यासाठी अनेक विद्यार्थी बीएड, डीएड, पीएचडी ही पदवी प्राप्त करतात.जर तुमचेही शिक्षण पूर्ण झाले असेल आणि तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर व्हायचे असेल तर कुरुक्षेत्र विद्यापीठात भरती सुरु आहे. कुरुक्षेत्र विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी ५४ जागा रिक्त आहेत. यामधील असिस्टंट प्रोफेसरसाठी ४६ जागा भरती केल्या जाणार आहे. असोसिएट प्रोफेसरसाठी ४ पदे तर प्राध्यापक पदासाठी ४ पदे भरली जाणार आहेत.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयाची अद पदानुसार बदलते. याबाबत अधिसूचना विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी संबंधित विषयात किमान ५५ टक्के गुणांसह पदवी प्राप्त केली असणे गरजेचे आहे. तसेच पीएचडी केलेले उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. NET, SET,SLER,CSIR UGC NET उत्तीर्ण उमेदवारदेखील अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांनी या क्षेत्रात कामाचा अनुभव घेतला असणे गरजेचे आहे.
ऑनलाइन पद्धतीने फॉर्म कसा भरावा
या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या kuk.ac.in या वेबसाइटला भेट द्या. तिथे Recruiment/Career असा पर्याय दिला असेल. त्यावर क्लिक करुन अर्ज दाखल करु शकतात.
या नोकरीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही. अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी घेतली जाईल.
या नोकरीसाठी प्राध्यापक या पदासाठी १४४००० रुपये मासिक पगार देण्यात येणार आहे. तर असोसिएट प्रोफेसर पदासाठी १,३१,४०० रुपये प्रति महिना आहे. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ५७७००० ते १८२००० रुपये पगार दिला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.