Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरी शोधताय? नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये तब्बल ५०० पदांसाठी भरती; पात्रता काय?

NICL Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये असिस्टंट पदासाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये भरती सुरु आहे. एनआयसीएलने या नोकरीबाबत अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली आहे.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होणार आहे. यासाठी तुम्हाला nationalinsurance.nic.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे. (Government Job)

एनआयसीएलमधील नोकरीसाठी उमेदवारांना फेज I आणि फेज II परीक्षा द्यावी लागणार आहे.एनआयसीएलमध्ये असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ५०० रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. तसेच उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करणार आहे त्या राज्याची स्थानिक भाषा त्या उमेदवाराला येणे गरजेचे आहे. याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. (NICL Recruitment)

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २१ ते ३० वर्ष असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रीलियम्स, मेन्स परीक्षा आणि रिजनल टेस्टद्वारे केली जाणार आहे. यासाठी फेज १ परीक्षा ३० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे तर असिस्टंट फेज २ परीक्षा २८ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे. (National Insurance Company Limited Recruitment)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

SCROLL FOR NEXT