भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. एनएचआयने सिनियर स्ट्रक्चरल/ब्रिज इंजिनियर, डोमेन स्पेशलिस्ट या पदांसाठी भती जाहीर केली आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती nhai.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
NHAI मध्ये या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.या भरतीअंतर्गत ११ पदे भरती केली जाणार आहे. यात ब्रिज/स्ट्रक्चरल इंजिनिअरसाठी १ जागा रिक्त आहे. ब्रिज डिझाइन इंजिनिअर, जिओ टेक्निकल इंजिनिअर, हायड्रोलॉजी अँड हायड्रोलिक एक्सपोर्ट, सिनियर टन इंजिनियर, टनल इंजिनियर या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात आली आहे. ४५ ते ६० वर्षातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत.
NHAI च्या या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे मासिक वेतन वेगवेगळे असणार आहे. स्ट्रकचरल आणि ब्रिज इंजिनिअर पदासाठी ५ लाख रुपये पगार मिळणार आहे.टेक्निकल इंजिनयर, हायड्रोलॉजी अँड हायड्रोलिक एक्सपोर्ट पदासाठी ३ लाख रुपये पगार मिळणार आहे. त ड्राफ्ट्समॅन पदासाठी ७५००० रुपये वेतन मिळणार आहे. सिनियर टनल इंजिनियर पदासाठी ५ लाख रुपये पगार मिळणार आहे.
NHAI मध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखत घेऊन उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना पुन्हा मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.