Mahavitaran Bharti Saam Tv
naukri-job-news

Mahavitaran Bharti: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महावितरण विभागात सुरु आहे भरती; असा करा अर्ज

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातम आहे. महावितरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. गोंदिया येथील महावितरण विभागात ही भरती केली जाणार आहे. १०वी आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. कार्यकारी अभियंता, संवसु विभाग, महावितरणद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. वायरमन आणि लाइटमनसह इतर अनेक पदांवर ही भरती केली जाणार आहे.

महावितरण विभागातील या भरतीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास+ ITI पास उमेदवार अर्ज करु शकतात. ८५ पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

गोंदिया येथे ही भरती केली जाणार आहे.या पदासाठी भरती गुणवत्ता यादीनुसार केली जाणार आहे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आहे.याबाबत उमेदवाराने www.apprenticeshipindia.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावे लागतील.

महावितरणमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे. ज्या तरुणांचे शिक्षण झाले आहे त्यांना कामाचा अनुभव हवा आहे. अशा उमेदवारांसाठी नोकरीची ही चांगली संधी आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कॅडर ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे. १४९७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची ही चांगली संधी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाकडून नवरात्रीचे ९ दिवस केले जाणार धरणे आंदोलन

Sarfaraz Khan : टीम इंडियात चान्स हुकला, पण खचला नाही! सरफराजनं ठोकलं द्विशतक, 52 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

VIDEO : 'सावरकरांबाबत संकुचित विचारसारणी हे मोठं आव्हान', सुशीलकुमार शिंदेंकडून सावरकरांचं कौतुक

Maharastra Politics : निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? VIDEO

Bhokardan Vidhan Sabha : मविआत रस्सीखेच; शिवसेना ठाकरे गटाने ठोकला दावा

SCROLL FOR NEXT