Gondia News : गोंदिया विधानसभेतून महिलांनी पाठवल्या मुख्यमंत्र्यांना राख्या; राखी प्रमाणे दिवाळीला ओवळणीत भेट देण्याची अपेक्षा

Gondia News : महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना सक्षम करण्याकरिता सुरू करण्यात आली असून याच्या महिलांना मोठा प्रमाणात फायदा होणार
Gondia News
Gondia NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 

गोंदिया : राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनेक महिलांनी अर्ज दाखल केले असून या योजनेत पात्र महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये जमा झाले आहेत. लाडकी बहीण योजनेची किस्त जमा झाल्याने महिलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मानत व हेच मुख्यमंत्री राहो असा आशीर्वाद देत गोंदिया विधानसभेतून शेकडो महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या पाठविल्या आहेत. राखीप्रमाणे दिवाळीला देखील ओवळणीत अशीच भेट मिळावी; अशी अपेक्षा व्यक्त करत गोंदियातील वीस महिला राख्या घेऊन रवाना झाल्या आहेत

Gondia News
Jamner News : रक्षाबंधनाला माहेरी आली, रात्रीच्या अंधारात घडलं भयंकर; विवाहितेच्या मृत्युने जामनेर तालुक्यात खळबळ

महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ही योजना महिलांना सक्षम करण्याकरिता सुरू करण्यात आली असून याच्या महिलांना मोठा प्रमाणात फायदा होणार आहे. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची किस्त १७ ऑगस्टला महिलांच्या खात्यात येणार अशी डेडलाईन देण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली. तर (Gondia News) गोंदिया जिल्ह्यातील अनेक महिलांना याच्या लाभ मिळाला असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील हजारो महिलांनी राख्या जमा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या राख्या पाठविल्या आहेत. तर गोंदिया जिल्ह्यातील २० महिला मुंबईसाठी रवाना झाल्या असून १९ ऑगस्टला वर्षा बंगल्यावर पोचून त्या मुख्यमंत्र्यांना राखी देखील बांधणार आहेत.

Gondia News
Parbhani News : औषधी व्यावसायिकाला धमकी देत मागितली खंडणी; तिघे पोलिसांच्या ताब्यात


गोंदिया जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाल्याने महिलांच्या आनंद द्विगुणीत झाला असून मुख्यमंत्र्यांनी ही फार सुंदर योजना आणली आणि मुख्यमंत्र्यांप्रती आपली सुद्धा काही कृतज्ञता आहे. याकरिता गोंदिया विधानसभेतून हजारो राख्या संकलित करून २० महिला या मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधन करण्यासाठी गोंदियावरून मुंबईला रावांना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना जो रक्षाबंधनाची अपूर्व अशी भेट दिली आहे; त्याची कृतज्ञता या महिलांनी व्यक्त केली असून ही योजना निरंतर सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करीत दिवाळी तेही मुख्यमंत्र्यांकडून बहिणीला अशीच ओवाळणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री पुन्हा येतील अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना पुढील मुख्यमंत्री आपण पुन्हा व्हावे असे आशीर्वाद गोंदिया जिल्ह्यातील महिला भगिनींनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com