Governement Job Saam Tv
naukri-job-news

Governement Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य विभागात भरती सुरु; पात्रता अन् अर्ज कसा करावा?

Maharashtra Health Department Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य विभागात सध्या भरती सुरु आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आरोग्य विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर तथा आयुर्वेद दवाखान्यात रिक्त पदे भरण्यात येणार आहे.(Government Job)

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती जाहीर केली आहे. याबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावा.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

आरोग्य विभागातील या भरतीसाठी २१ आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. अर्धवेळ योग प्रशिक्षक या पदासाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून योग विषयाची पदवी किंवा नामांकित योग्य संस्थेचे सर्टिफाइड योग प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे. (Aarogya Vibagh Bharti)

सोलापूरमध्ये ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यास उमेदवाराला दर महिन्याला ८००० रुपये पगार देण्यात येईल. एका योग सत्रासाठी २५० रुपये मिळणार आहे.या नोकरीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीसाठी राबवण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांनी मुलाखतीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी कार्यालयात उपस्थित राहायचे आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२५ आहे. तसेच अर्ज केलेल्या व्यक्तींना १० मार्च रोजी १०.३० वाजता मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

Maharashtra Live News Update : चंद्रकांत पाटलांकडून उमेदवारांच्या प्रचारार्थी मॅरेथॉन बैठका

शेवटची तारीख उलटून गेली, अजूनही HSRP नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार? वाचा

'धुरंधर'चा खेळ संपला; बॉक्स ऑफिसवर The Raja Saabचं तुफान, प्रभासच्या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pune : 'त्या' क्लबच्या मद्यपरवाना निलंबनावर स्थगिती, उच्च न्यायालयाने काय घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT