Dhule GBS Patient : धुळ्यात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला; आरोग्य विभाग अलर्ट

Dhule News : धुळे शहरातील चाळीसगाव रोडला लागून कबीरगंज परिसर आहे. या परिसरातील गिलानी कॉलनीतील एका ४८ वर्षीय संबंधित रुग्ण पुरुष असुन त्याची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली होती
Dhule GBS Patient
Dhule GBS PatientSaam tv
Published On

धुळे : राज्यात जीबीएसचे रुग्ण अनेक शहरांमध्ये आढळून आले आहेत. तर दोन रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाले आहेत. याच दरम्यान धुळे शहरात देखील आता जीबीएस आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. धुळ्यात पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

धुळे शहरातील चाळीसगाव रोडला लागून कबीरगंज परिसर आहे. या परिसरातील गिलानी कॉलनीतील एका ४८ वर्षीय संबंधित रुग्ण पुरुष असुन त्याची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली होती. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर या व्यक्तीला हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णाच्या रक्त, लघवीसह इतर चाचण्या झाल्या असुन त्यातून त्याला जीबीएसची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.  

Dhule GBS Patient
Ulhasnagar News : १०८ रुग्णवाहिकेचा गरिबांच्या आरोग्याशी खेळ; दुपारी कॉल केल्यानंतर रुग्णवाहिका सायंकाळी दाखल, रुग्णाचा मृत्यू

चाळीसगावहून परतल्यानंतर झाला त्रास 

धुळे जिल्ह्यात हा पहिला रुग्ण जीबीएसचा आढळून आला असून हा रुग्ण गेल्या काही दिवसांपूर्वी चाळीसगाव येथे काही कामानिमित्त गेले होते. चाळीसगाव येथून परतल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्रास जाणवू लागला. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याच्या रक्त आणि लघवीच्या चाचण्या करण्यात आल्या आणि त्यातून जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

Dhule GBS Patient
Nashik News : चॉपरने केक कापणे पडले महागात; बर्थ डे बॉयला घेतले ताब्यात

अतिदक्षता विभागात उपचार, प्रकृती स्थिर 

शहरातील चाळीसगाव रोड भागात राहणारा हा रूग्ण असुन त्याच्यावर हिरे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल केले असुन त्याला श्वसनाचा कोणताही त्रास नसून मेंदू विकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. रोग्य अधिकाऱ्यांतर्फे खबरदारीचे उपाय म्हणून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com