HCL Recruitment Saam Tv
naukri-job-news

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

HCL Recruitment 2026: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सध्या कंपनीत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

एचसीएलमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

विविध पदांसाठी भरती जाहीर

मिळणार लाखो रुपये पगार

सरकारी कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहताय तर ही बातमी तुमच्यासाठी. सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु आहे. एचसीएलमध्ये सीनियर सब्जेक्ट एक्सपोर्ट, सब्जेट एक्सपोर्ट आणि मेडिकल प्रोफेशनलसह अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

एचसीएल ही भारत सरकारची कंपनी आहे. या कंपनीत जर तुम्हाला काम करायचे असेल तर तुम्ही www.hindustancopper.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

विशेष म्हणजे या सरकारी नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. फक्त इंटरव्ह्यूद्वारे तुमचे सिलेक्शन केले जाणार आहे. जे तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

एचसीएलमध्ये या पदांसाठी भरती

सीनियर सब्जेक्ट एक्सपोर्ट मायनिंग, एनवायरमेंट पदासाठी २ जागा रिक्त आहे. सब्जेक्ट एक्सपोर्ट मायनिंग पदासाठी १ जागा रिक्त आहे. असोसिएट सब्जेक्ट एक्सपोर्ट ज्यूलॉजी पदासाठी १ जागा आहे. असिस्ंटट सब्जेक्ट एक्सपोर्ट ऑफिशियल लँग्वेज, मेडिकल प्रोफेशनल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

सरकारी कंपनीतील या नोकरीसाठी पात्रतादेखील वेगवेगळी असणार आहे. सिनियर सब्जेक्ट मायनिंग पदासाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएट किंवा मायनिंग इंजिनियरिंग केलेले असवे. एनवायरमेंट सिनियर सब्जेक्ट एक्सपोर्ट पदासाठी इंजिनियरिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.

पगार

या नोकरीसाठी तुम्हाला दर महिन्याला फिक्स्ड वेतन मिळणार नाहीये. सीनियर सब्जेक्ट एक्सपर्ट, एसोसिएट सब्जेक्ट एक्सपर्ट और असिस्टेंट सब्जेक्ट एक्सपर्टची दर महिन्याला १६ विजिट असणार आहे. प्रत्येक विजिटला त्यांना ३५०० ते ६,२५० रुपये मिळणार आहे. म्हणजेच महिन्याला तुम्हाला १ लाख रुपये मिळू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fort : किल्ला, समुद्र अन् हजारो फ्लेमिंगो; मुंबईतील 'या' ठिकाणाचं सौंदर्य मन मोहून टाकतं!

Diabetes Diet: डायबिटीजच्या रुग्णांसाठी 'ही' भाजी ठरू शकते फायदेशीर; ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी नक्की खा

Maharashtra News Live Update: धुळे सोलापूर महामार्गवर पुन्हा मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला

सत्ताधारी पक्षातील नेत्याची भररस्त्यात हत्या; कार्यालयात जाताना सहा जणांच्या टोळीने घेरलं अन्...

विंचू आणि साप चावण्यात नेमका काय फरक? पावसाळ्यात या घटना का वाढतात, जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

SCROLL FOR NEXT