Government Job Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बोर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. ड्राफ्टसमॅन, सुपरवायजर, टर्नर, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्टसह अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
बॉर्डर रोड ऑर्गानायझेशनमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १६ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती bro.gov.in या वेबसाइटवरुन देण्यात आली आहे.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे.ड्राफ्ट्समॅनसाठी १६ पदे रिक्त आहे. ऑपरेटर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट पदासाठी तब्बल ४१७ जागा रिक्त आहेत.ड्रायव्हर रोड रोलर पदासाठी २ जागा रिक्त आहेत. एकूण ४६६ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी,१२ वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीबाबत अधिक माहिती तुम्ही वेबसाइटवर जाऊन मिळवू शकतात.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधील या नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट, स्क्रिनिंग टेस्ट, ड्रायव्हिंग टेस्ट आणि कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे, या नोकरीसाठी उमेदवारांना पदानुसार पगार मिळणार आहे. उमेदवारांना १८,००० ते ८१,१०० रुपये पगार मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.