FSSAI Recruitment Saam Tv
naukri-job-news

FSSAI Recruitment: ग्रॅज्युएट आहात? FSSAI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? वाचा

FSSAI Recruitment 2025: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. FSSAI मध्ये सध्या फूड अॅनालिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच (FSSAI) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. फूड अॅनालिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (FSSAI Recruitment Application Process)

एफएसएसएआयमध्ये सध्या (11th FAE-2025) साठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी अर्ज करायचे आहेत. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्हाला fssai.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

ग्रॅज्युएट ते पीएचडीधारक करु शकतात अर्ज

फूड अॅनालिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने केमिस्ट्री, डेअरी केमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, फूड सेफ्टी, अॅग्रीकल्चर सायन्समध्ये अंडर ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. याचसोबत पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडीधारकदेखील अर्ज करु शकतात. त्यांनी इन्स्टिटयूश ऑफ केमिस्ट्समध्ये फूड अॅनालिस्ट सेक्शनची परीक्षा पास केलेली असावी. याचसोबत तीन वर्षांचा फूड अॅनालिसिसचा अनुभव असायला हवा.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला एफएसएसएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवरील भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.

यानंतर रजिस्ट्रेशन बटणवर क्लिक करुन सर्व माहिती भरा.

यानंतर लॉग इन करुन संपूर्ण फॉर्म भरा आणि शुल्क भरुन सबमिट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात ठाकरे गट आणि काँग्रेसची युती जाहीर

Thyroid treatment: ना टाका, ना वेदना, ना ऑपरेशन...! 'या' अत्याधुनिक उपचाराने थायरॉईडवर कायमची मात

BMC Election : मुंबईतून पहिली बंडखोरी! मनसे नेत्या अनिशा माजगावकर अपक्ष निवडणूक लढवणार

Silver Jewellery Benefits: चांदीचे दागिने घालण्याचे फायदे काय?

Akshaye Khanna: 'सनकी, सर्वांचा अपमान करतो...'; 'या' दिग्दर्शकाने अक्षय खन्नावर केले गंभीर आरोप, म्हणाला...

SCROLL FOR NEXT