फास्ट फूड अन् ऑनलाइन जेवणामुळे कॅन्सर, डॉक्टरांनी सांगितला नेमका धोका, वाचा काय म्हणाले तज्ज्ञ

Online food orders cancer risk: आधुनिक जीवनशैलीत फास्ट फूड आणि ऑनलाइन फूड ऑर्डर करण्याची सवय वाढली आहे. सोयीसाठी लोक वारंवार बाहेरचे अन्न खातात. परंतु आरोग्य तज्ञांच्या मते ही सवय कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला आमंत्रण देऊ शकते.
Online food orders cancer risk
Online food orders cancer riskSAAM TV
Published On

फास्ट फूड म्हटलं की लहान मुलांपासून ते तरूणांपर्यंत जवळपास प्रत्येकाला हे फार आवडतं. लहान मुलं आणि तरूण मंडळी यांच्यात फास्ट फूडची आवड वाढलीये. इतकचं नाही तर आता एक क्लिकवर तुम्हाला घरपोच फास्ट फूडची डिलीव्हरी मिळते. मात्र ही आवड आणि ऑलनाईन ऑर्डरिंगची वाढती सवय भविष्यात कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देत असल्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

आधुनिक जीवनशैली, व्यस्त दिनक्रम आणि एका क्लिकवर घरबसल्या हवा तो पदार्थ मिळण्याची सोय यामुळे लोक जंक फूडकडे अधिक आकर्षित होतायत. मात्र हे आरोग्यासाठी घातक असून यामुळे कॅन्सर होत असल्याचं समोर आलं आहे.

Online food orders cancer risk
Benefits of walking: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली! दररोज चाला फक्त इतकी पावलं, वजनही होईल कमी

तज्ज्ञांच्या मतानुसार, फास्ट फूडमध्ये असलेलं मीठाचं अधिक प्रमाण, साखरेचं जास्त प्रमाण, ट्रान्स-फॅट आणि प्रोसेस्ड घटक inflammation निर्माण करतात आणि पेशींमध्ये बदल घडवून कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. विशेषतः बर्गर, पिझ्झा, फ्राईड आयटम्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि प्रोसेस्ड मीटचा वारंवार वापर अधिक धोकादायक मानला जातो.

जंक फूडमुळे होतोय कॅन्सर?

ऑनलाइन फूड ऑर्डरिंगमुळे लोक वारंवार, मोठ्या प्रमाणात आणि अनेकदा रात्री उशिरा जंक फूडचं सेवन करत असल्याचं दिसून आलंय. परिणामी यामुळे लठ्ठपणा, हार्मोनल असंतुलन आणि मेटाबॉलिक सिंड्रोम वाढतो. या घटकांचा आणि स्तनाचा, कोलनचा आणि यकृताच्या कॅन्सरशी संबंधित असल्याचं अनेक अभ्यासामधून समोर आलं आहे.

Online food orders cancer risk
Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

तज्ज्ञांनी फूड डिलिव्हरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आणि कोटेड पॅकेजिंगमध्ये असलेले PFAS, बीपीए-BPA आणि माइक्रोप्लास्टिक्स ही रसायनंही धोकादायक असल्याचे सांगितले. गरम अन्नाशी याचा संपर्क आल्यावर ही रसायनं अन्नात मिसळू शकतात आणि याचमुळे कॅन्सर वाढण्याचा धोका निर्माण होतो.

Online food orders cancer risk
Cervical Cancer: या लक्षणांना इग्नोर केल्यास वाढतो सर्वायकल कॅन्सरचा धोका; कोणत्या महिलांना असतो अधिक धोका?

तळेगावातील टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजी डॉ. गौरव जसवाल यांनी सांगितलं की, फास्ट फूड आणि ऑनलाइन ऑर्डरिंग हा एक सोपा मार्ग वाटत असला आणि लोकांना वाटतं की अधूनमधून फास्ट फूड खाल्ल्याने काही फरक पडत नाही. पण ही सततची सवय शरीरात विषारी रसायनांची पातळी वाढवते आणि शरीरात इन्फ्लामेशन निर्माण करुन आणि हार्मोनल बदलांमुळे कॅन्सरची सुरुवात करण्यास कारणीभूत ठरते.

Online food orders cancer risk
Early cancer symptoms: कॅन्सरचा धोका कसा ओळखाल? ही ८ लक्षणं वारंवार देतात संकेत, दुर्लक्ष करू नका!

डॉ. जसवाल पुढे सांगतात की, फास्ट फूड आणि ऑनलाइन ऑर्डरिंगमुळे कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काही सोप्या सवयींचे पालन करा. शक्यतो घरचं ताजं अन्न खाल्लं पाहिजे. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य यांचा आहारात समावेश करा. बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फाईज आणि रेडी-टू-ईट पदार्थांपासून लांब रहा. तसंच, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि साखर, मीठ व तेलाचे प्रमाण मर्यादित ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com