Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Diabetes First Symptom in Eyes: मधुमेह हा आजार शरीरातील अनेक अवयवांवर परिणाम करतो. परंतु त्याची पहिली लक्षणे बहुधा डोळ्यांमध्ये दिसतात. डोळ्यांमध्ये होणारे बदल हे डायबिटीजचे सुरुवातीचे संकेत असतात.
Diabetes First Symptom in Eyes
Diabetes First Symptom in Eyessaam tv
Published On

सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेक गंभीर आजारांचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये टाईप-२ मधुमेहाचा देखील समावेश आहे. मधुमेह हा आपल्या शरीरातील ब्लड शुगरवर परिणाम करतो. मात्र तुम्हाला माहितीये का की, मधुमेहाचं सर्वात पहिलं लक्षण तुमच्या डोळ्यात दिसून येतं. दृष्टीमध्ये अचानक बदल होणं हे मधुमेहाचं सर्वप्रथम लक्षण मानलं जातं.

सेंटर्स ऑफ डिसीस क्रंट्रोल अँड प्रिवेन्शनच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत अंदाजे ३०.३ दशलक्ष प्रौढ व्यक्तींना मधुमेह झाला असून त्यापैकी जवळपास ९०% लोकांना टाईप २ डायबिटीज आहे. मधुमेहाला सामान्यपणे न्युरोपथी किंवा किडनी आजारांशी जोडण्यात येतं. मात्र डोळ्यामध्ये देखील याची लक्षणं दिसून येतात.

डोळा हा नाजूक अवयव असून डोळ्याच्या मागील बाजूस असलेला रेटीना हा दृष्टीसाठी महत्त्वाचा असतो. रक्तातील साखरेची पातळी जास्त झाली की डोळ्यांमधील छोट्या-छोट्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन त्या सूजतात. या रक्तवाहिन्यांच्या कामात अडथळा आला की डायबेटिक रेटिनोपथी म्हणतात.

जवळपास एक तृतीयांशाहून जास्त नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये डायबेटिक आय डिसीजची लक्षणं पाहायला मिळतात. मुख्य म्हणजे अनेकांना हा आजार आहे हे कळतही नाही.

डायबेटिक रेटिनोपथी म्हणजे काय?

डायबेटिक रेटिनोपथी या आजाराच्या पहिल्या टप्प्यात रूग्णाला कोणत्याही वेदना होत नाही. इतकंच नाही तर याची कोणतीही लक्षणंही दिसून येत नाही. त्यामुळे नियमित डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. जर मधुमेह नियंत्रणात ठेवला नाही, तर दृष्टी कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे अंधत्व येण्याचा धोका असतो.

Diabetes First Symptom in Eyes
Abdominal Symptoms: पोटदुखी अचानक वाढलीये? कॅन्सरचा असू शकतो धोका, वाचा तज्ज्ञांचे मत

मधुमेहाची तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येणारी लक्षणं

फ्लोटर्स

अचानक डोळ्यामध्ये तरंगणारे छोटे ठिपके दिसून लागणं म्हणजे फ्लोटर्स. जर तुम्हाला अधिक प्रमाणात हे ठिपक दिसत असतील किंवा दृष्टी धूसर होत असेल तर हे रेटिनामध्ये रक्तस्रावाचं लक्षण आहे.

धुसर दिसणं

तुमच्या शरीरात ब्लड शुगर लेवल अचानक बदलत असेल तर तुम्हाला लक्ष केंद्रीत करण्यावर परिणाम होतो. अनेकदा यामुळे दृष्टी धुसर होते. यावेळी पुस्तक वाचताना किंवा गाडी चालवताना त्रास होतो.

Diabetes First Symptom in Eyes
Skin cancer symptoms: त्वचेवर अचानक ही ५ लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध, असू शकतो कॅन्सरचा धोका

डार्क स्पॉट्स

कमी दिसून लागणं किंवा अंधुक डाग दिसणं हे गंभीर लक्षणं मानलं जातं. जर दिसताना अशा प्रकारची अडचण दिसत असेल तर हे रेटिनामध्ये सूज येणं किंवा रक्तस्त्राव होण्याचं लक्षण असू शकतं.

Diabetes First Symptom in Eyes
Calorie Burning Workouts: वजन घटवण्यासाठी किती वेगाने चाललं पाहिजे? जाणून घ्या कॅलरी लॉसचं संपूर्ण गणित

दृष्टी कमी होणं

काही प्रमाणात दृष्टी कमी होणं म्हणजेच बाजूची दृष्टी कमी होणं किंवा मंद प्रकाशात दिसण्यात अडचण येणं हे रेटिनोपथी किंवा रेटिनल डिटॅचमेंटचं लक्षण असू शकतं. काही डोळ्यांसमोर पूर्ण अंधारी येते. हे रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर हानी झाल्याचं संकेत असतात.

Diabetes First Symptom in Eyes
Benefits of walking: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली! दररोज चाला फक्त इतकी पावलं, वजनही होईल कमी

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com