

सततची किंवा वाढती पोटदुखी कॅन्सरचे संकेत असू शकतात.
शौचातील बदल, वजन कमी होणे व मळमळ ही गंभीर लक्षणे आहेत.
कॅन्सर लवकर ओळखण्यासाठी अवयवांची वाढ, पिवळेपणा याकडे लक्ष द्या.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना पाहायला मिळतात. त्यामध्ये बाहेरच्या खाण्याचा समावेश होतो. मग पोटदुखीची समस्या हमखास पाहायला मिळते. तज्ज्ञांच्या मते, सतत राहणारी किंवा वाढणारी पोटदुखी ही काही साधी किरकोळ कारणांमुळे नसून गंभीर आजाराचं लक्षण असू शकते.
यामध्ये कॅन्सरचाही समावेश असतो. पोटातील काही लक्षणे हे पचनसंस्थेशी संबंधित तसेच इतर पोटातील अवयवांना होणाऱ्या विविध प्रकारच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात. जरी ही लक्षणे अनेकदा साध्या आजारांमुळे दिसत असली तरी ती बराचवेळ टिकल्यास किंवा तीव्र स्वरूपात जाणवल्यास लगेचच वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
सततची किंवा तीव्र पोटदुखी ही स्टमक कॅन्सर, पॅनक्रियाज कॅन्सर किंवा कोलोरेक्टल कॅन्सरची शक्यता असते. वेदनेची जागा आणि स्वरूप हे त्या कॅन्सरच्या प्रकारानुसार बदलू शकते. वारंवार मळमळणे किंवा उलट्या होणे हे पोटाचा कर्करोग, पॅनक्रियाज कॅन्सर किंवा लिव्हर कॅन्सरचे संकेत असू शकतात. विशेषत: या लक्षणात डोळे पिवळे पडणे किंवा वजन कमी अशा समस्या जाणवतात.
वजन कमी होणं हे अनेक कॅन्सरमध्ये विशेषत: पोट, पॅनक्रियाज आणि कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये सहजपणे दिसून येते आणि अनेकदा हे रोग प्रगत अवस्थेत असल्याचे दर्शवते. शौचाच्या सवयींमध्ये बदल, वारंवार जुलाब, बद्धकोष्ठता किंवा शौचाच्या स्वरूपात बदल दिसत असल्यास कोलोरेक्टल कॅन्सरची शक्यता निर्माण होते. शौचात रक्त दिसणे हे एक महत्त्वाचे चिन्ह मानले जाते.
काही रुग्णांमध्ये पोट फुगणे किंवा लवकर पोट भरल्यासारखे वाटणे ही समस्या दिसते. ही लक्षणे अंडाशयाच्या कॅन्सरमध्ये किंवा पॅनक्रियाज कॅन्सरमध्ये जाणवतात आणि त्यासोबत जेवणात अडचणही भासू शकतात. काही कॅन्सरमध्ये अवयवांची वाढही दिसून येते. लिव्हर कॅन्सरमध्ये यकृत वाढणे (हेपॅटोमेगली) जाणवू शकते, तर लिम्फोमा किंवा ल्यूकेमियासारख्या कर्करोगांमध्ये प्लीहा वाढणे (स्प्लेनोमेगली) दिसते. किडनी कॅन्सरमध्ये पोटात किंवा बाजूला वेदना आणि कधी कधी पोटात गाठ जाणवू शकते.
सूचना: ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला अनिवार्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.