भारतात फेसबुकमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी  Samm Tv
naukri-job-news

Job Openings Meta : तरुणांसाठी खुशखबर! जगातील नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी; शैक्षणिक पात्रता अन् पद कोणकोणती?

Facebook Hires Engineers and Product Staff : मेटा भविष्यातील उत्पादने विकसित करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या शोधात आहे, आणि त्यासाठी बेंगळुरूमध्ये एंटरप्राइझ इंजिनिअरींग टीमची स्थापना करण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ल्ली : फेसबुकची मूळ कंपनी असलेल्या मेटाने काही दिवसांपूर्वी आपल्या जागतिक स्तरावरील कर्मचार्‍यांमध्ये ५% कपातीची घोषणा केली होती. तरीही, कंपनीने भारतीयांसाठी संधीची दारे खुली केली आहेत, कंपनीने बेंगळुरूमध्ये नवीन कार्यालय उघडले आहे. या कार्यालयात अभियांत्रिकी आणि उत्पादन विभागांसाठी नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. मेट्यातील एका बड्या प्रवक्त्याने या बातमीला दुजोरा दिला आहे.

मेटा भविष्यातील उत्पादने विकसित करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सच्या शोधात आहे, आणि त्यासाठी बेंगळुरूमध्ये एंटरप्राइझ इंजिनिअरींग टीमची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे अंतर्गत टीम्सची उत्पादकता वाढवण्यासाठी नवीन उत्पादने तयार केली जातील.

मेटा भारतात २०१० मध्ये पहिलं कार्यालय उघडून आता गुरुग्राम, नवी दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये कार्यरत आहे. या कार्यालयांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप सारख्या टीमव्यतिरीक्त विक्री, विपणन, व्यवसाय विकास, धोरण, कायदा आणि वित्त विभागांतील कर्मचारी देखील आहेत.

मेटाचा भारतातील फोकस सध्या इंजिनिअरींग टॅलेंटवर आहे, आणि त्याचबरोबर सॉफ्टवेअरसोबतच हार्डवेअर अभियंत्यांचीही भरती केली जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) क्षेत्रात मोठ्या कंपन्या, जसे गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआय, स्पर्धा करत आहेत, आणि मेटा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करत आहे. मेटा २०२५ पर्यंत ६० ते ६५ अब्ज डॉलर्स खर्च करून AI क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्याची योजना करत आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT