Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: परीक्षा नाही थेट सरकारी नोकरी; पॅकेज २१ लाख रुपये; पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

EIL Recruitment 2026: इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सरकारी कंपनीत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

Siddhi Hande

सरकारी कंपनीत नोकरीची संधी

इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये भरती

मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती

अर्ज कसा करावा?

चांगल्या सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या नवरत्न कंपनीत भरती जाहीर करण्यात आली आहे. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाहीये.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमध्ये विविध विभागात ही भरती केली जाणार आहे. इच्छुकांनी engineersindia.com वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कालपासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०२६ आहे. एकूण ५९ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमधील या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे. ६०,००० ते १,८०,००० रुपये मासिक पगार मिळणार आहे. वार्षिक २१ लाखांचे पॅकेज मिळणार आहे. याचसोबत इतर अनेक भत्ते मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड गेट २०२६ स्कोरच्या आधारे होणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टिंग आणि ग्रुप डिस्कशन केले जाणार आहे. या नोकरीसाठी ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे.

सरकारी कंपनीतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदावाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई, बीटेक किंवा बीएससी (इंजीनियरिंग) केलेले असावे. याचसोबत गेट २०२६ परीक्षा पास केलेली असावी. केमिकल विभागात काम करण्यासाठी केमिकल इंजिनियरिंग, मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंजिनियरिंग, सिव्हिलासाठी सिव्हिल इंजिनियरिंग केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २५ वर्ष असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

अर्ज कसा करावा?

इंजिनियर्स इंडिया लिमिटेडमधील या नोकरीसाठी तुम्हाला engineersindia.com वर जायचे आहे.

यानंतर Recruitment of Management Trainees यावर क्लिक करायचे आहे.

यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा.

यानंतर तुमची सर्व माहिती भरा. मोबाईल नंबर आणि शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करा.

यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. त्याआधी प्रिंट आउट काढून घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT