Shruti Kadam
क्रिती सॅनॉनने आज बॉलीवूडमध्ये आपल्या ११ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीचा टप्पा गाठला आहे.
२०१४ मध्ये हिरोपंतीच्या माध्यमातून पदार्पण करताना एक बाहेरून आलेली नवोदित अभिनेत्री म्हणून तिच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.
हिरोपंतीमध्ये 'डिंपी'सारख्या ठाम स्वभावाच्या तरुणीच्या भूमिकेपासून सुरुवात करून, क्रितीने 'बरेली की बर्फी' मधील ‘बिट्टी’, लुका छुपी ' मधील आत्मविश्वासी स्त्री ते 'मिमी ' मधील सरोगेट आईपर्यंत विविध स्तरांवर अभिनय सादर केला
मिमी चित्रपटातल्या तिच्या जबरदस्त भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं, ज्यामुळे तिच्या अभिनयक्षमतेला नव्या उंचीची ओळख मिळाली.
त्यानंतरच्या काळात क्रितीने भेड़िया मधील रहस्यमय डॉ. अनिका, तेरी बातों में ऐसा उलझा जियामधील ह्युमनॉइड रोबोट, क्रू मधील एक आक्रमक एअर होस्टेस आणि अलीकडील दो पत्ती मधील दुहेरी भूमिकांमधून तिची बहुपदस्थता आणि अभिनयातील खोली पुन्हा सिद्ध केली.
आज ज्या काळात स्त्रीप्रधान कथा केंद्रस्थानी येत आहेत, त्या काळात क्रिती सॅनॉनने आपल्या निवडींमधून केवळ धाडसच दाखवलं नाही, तर हिंदी सिनेमाचं भविष्य घडवण्याचं काम केलं आहे.