DRDO Job Saam Tv
naukri-job-news

DRDO Internship: कोणतीही परीक्षा नाही; डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कसा कराल?

DRDO Paid Intenship for UG-PG Students: डीआरडीओमध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. डीआरडीओमध्ये पेड इंटर्नशिप करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

Siddhi Hande

DRDO मध्ये इंटर्नशिप

ग्रॅज्युएट उमेदवारांनासाठी पेड इंटर्नशिपची संधी

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंटर्नशिप

जर तुमचे शिक्षण पूर्ण झाले असेल आणि तुम्हाला काम करायचे असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठ्या रिसर्च सेंटर डीआरडीओमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्णसंधी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत सध्या अंडर ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युट विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी आहे. १ जानेवारी २०२६ पासून डीआरडीओमध्ये पेड इंटर्नशिप दिली जाणार आहे.

डीआरडीओमधील ही इंटर्नशिप इंजिनियरिंग आणि सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. त्यांना सरकारी रिसर्च सेंटरमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.

डीआरडीओची पेड इंटर्नशिप सहा महिन्यांसाठी असणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या इंटर्नशिपसाठी विद्यार्थी रिमोट सेन्सिंग आणि जिओइन्फॉरमॅटिक्ससाठी अर्ज करु शकतात. या इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ असणार आहे.

डीआरडीओमधील इंटर्नशिपसाठी उमेदवारांनी विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी २८ पेक्षा कमी वयोगटातील उमेदवा अर्ज करु शकतात. AICTE किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात.

परीक्षेशिवाय निवड (DRDO Internship Without Exam)

या इंटर्नशिपसाठी उमेदवारांची परीक्षेशिवाय निवड केली जाणार आहे. उमेदवारांना किमान ७५ टक्के किंवा ७.५ सीजीपीए असणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी कागदपत्र पडताळणी केली जाणार आहे. इंटर्नशिपसाठी दर महिन्याला ५००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यासाठी अर्ज डिफेन्स, जिओइन्फॉर्मॅटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, सेक्टर ३७A, चंदीगड १६००३६ या पत्त्यावर पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: प्लॅटफॉर्मवर बसून पाहत होता पॉर्न व्हिडीओ, महिलेने तरुणाला धडा शिकवला; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Vrindavan : वृंदावनला जाताय? मग या ७ ठिकाणी नक्कीच भेट द्या

Indian Railway: वंदे भारतच्या २४ फेऱ्या महाराष्ट्रातून, सर्वाधिक जाळं पुण्यात, वाचा कोणती Vande Bharat कुठून धावते?

Pooja-Soham Bandekar Wedding : बांदेकरांची सून अन् लेकाचे लग्नातील Unseen फोटोज, पाहा पूजा-सोहमची केमिस्ट्री

SCROLL FOR NEXT