CRPF Recruitment: Saam Tv
naukri-job-news

CRPF Recruitment: CRPF मध्ये नोकरी अन् ७५००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

CRPF Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीआरपीएफमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रय रिझर्व्ह पोलिस दलात नोकरीची सुवर्णसंधी आहे. CRPF मध्ये वेटरनरी पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.तरुणांकडे सरकारी नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही crpf.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. (CRPF Recruitment)

सीआरपीएफमधील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ७० वर्षे असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वेटरनरी सायन्स आणि लाइवस्टॉकमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले असावे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७५,००० रुपये पगार मिळणार आहे. तसेच भविष्य निधी, पेन्शन, वैद्यकीय सुविधादेखील मिळणार आहे. (CRPF Recruitment 2024)

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीनंतर त्यांची वैद्यकीय तपासणीदेखील केली जाणार आहे.या नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू ६ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. कम्पोजिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, जीसी कॅम्प्स, तळेगाव येथे तुम्हाला उपस्थित राहायचे आहे. मुलाखतीला उपस्थित राहताना तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे घेऊन जायचे आहे. (Government job)

सिडकोमध्ये नोकरीची संधी

सध्या सिडकोमध्येही भरती सुरु आहे. सिडकोमध्ये सहाय्यक विकास अधिकारी, क्षेत्राधिकारी पदासाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला सिडकोच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष असावे, या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,३२,००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT