उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील अवसानेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी भीषण दुर्घटना.
विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी; २ भाविकांचा मृत्यू, ३८ जखमी.
सायंकाळी साडेतीन वाजता घटना; करंट लागून भाविक पळू लागले.
जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक; प्रशासकीय पातळीवर तपास सुरू
Shravan Somvar tragedy at Avsaaneshwar Mandir Barabanki : उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील अवसानेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. विजेची तार तुटून पडल्याने चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले आहेत. श्रावण सोमवारसाठी अवसानेश्वर मंदिरात जलाभिषेकासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
पहाटे तीन वाजता ही दुर्दैवी घटना घडली. पहाटे विजेची तार तुटून मंदिराच्या शेडवर पडली. त्यामुळे संपूर्ण शेडला विजेचा झटका बसला. त्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि चेंगराचेंगरी झली. या घटनेत 38 भाविक जखमी झाले, तर दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २२ वर्षीय प्रशांत आणि आणखी एका भाविकाचा समावेश आहे. दोघांचा मृत्यू त्रिवेदीगंज सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) उपचारादरम्यान झाला.
चेंगराचेंगरी झाल्यानंतर जखमींना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्रिवेदीगंज सीएचसीमध्ये १० जखमींवर उपचार सुरू आहेत. यामधील पाच जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रूग्णालयात रेफर करण्यात आले. हैदरगढ सीएचसीमध्ये 26 जखमींवर उपचार सुरू आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मंदिर परिसरात आणि आसपासच्या भागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. ही दुर्घटना नेमकी कशी झाली? या कारणांचा तपास सुरू आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, ही घटना पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सामान्य दिवशी इतक्या लवकर एवढी गर्दी नसते, परंतु श्रावणचा सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची मोठी झुंबड उडाली होती. काही स्थानिकांच्या मते, एका माकडाने विजेच्या तारांवर उडी मारली, ज्यामुळे तार तुटली. तार तुटल्याने शेडला करंट लागला आणि त्याची बातमी पसरताच भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे लोक सैरावैर धावू लागले अन् चेंगराचेंगरी झाली. यात दोन जणांचा मृत्यू झाला. प्रशासनाने भाविकांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.