जळगाव शहरातील जोशी कॉलनीत जुना वाद उफाळून आल्याने एका व्यक्तीचा खून करण्यात आला.
धीरज हिवराळे यांच्यावर कल्पेश चौधरीने धारदार शस्त्राने वार केला.
धीरज आणि कल्पेश यांच्यात पूर्वीपासून वैर होतं आणि रविवारी दोघे समोरासमोर आले.
पोलिसांनी घटनेनंतर तपास सुरू केला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जुना वाद नव्याने पेटल्यानं धारदार शस्त्राने वार करत एकाचा खून झाल्याची घटना जळगाव शहरात घडली. शहरातील जोशी कॉलनीत रविवारी दुपारी ही घटना घडली. धीरज दत्ता हिवराळे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कल्पेश वसंत चौधरी असं मारेकऱ्याचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हिवराळे आणि कल्पेश चौधरी यांच्यात पूर्वीपासून वैमनस्य होते. रविवारी दुपारी नवीन जोशी कॉलनीत दोघे समोरासमोर आले. त्याच्यात पुन्हा नव्याने वाद झाला. मात्र यावेळी त्यांच्या वादानं भयाण रुप घेतलं होतं. त्यांच्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झालं.
दोघांनीही धारदार शस्त्राने एकमेकांवर वार केले. या हल्ल्यात धीरज याच्या छातीत खोलवर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तेथील स्थानिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर कल्पेश चौधरी याच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा जिल्हा रुग्णालयात तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईक आणि मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला होता.
काही दिवसापूर्वी जळगावमध्ये दोन गटात राडा झाला होता. जुन्या वादातून दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. या दगडफेकीमध्ये दोन्ही गटातील पाच ते सहा जण जखमी झाले. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत मागील काही दिवसांपासून दोन गटांत वाद सुरू होता. मंगळवारच्या रात्री काही तरुण परिसरातील स्वामी समर्थ चौकातील अपार्टमेंट जवळ उभे होते. तेव्हा दहा ते बारा तरुणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येत शिवीगाळ करीत तेथे उभ्या तरुणांवर अचानक दगडफेक केली. रात्रीच्या अंधारात झालेल्या दगडफेकीमुळे नागरिक भयभीत झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.