CBSE Recruitment Saam Tv
naukri-job-news

CBSE Recruitment: सीबीएसईमध्ये नोकरी करण्याची संधी;विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

CBSE Recruitment 2025: सीबीएसईमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. असिस्टंट प्रोफेसर, डायरेक्टर, ट्रान्सलेटर अशा विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सीबीएसईमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी

विविध पदांसाठी भरती सुरु

असिस्टंट प्रोफेसर ते सुप्रीटेंडेंट पदांसाठी भरती जाहीर

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे सीबीएसईमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. सीबीएसईमध्ये ए, बी आणि सीअंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनअंतर्गत या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०२५ आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी तुम्ही www.cbse.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सीबीएसईमध्ये एकूण २२४ पदांसाठी भरती केली जाणार आहे. असिस्टंट सेक्रेटरी, असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट डायरेक्टर (ट्रेनिंग), असिस्टंट प्रोफेसर/असिस्टंट डायरेक्टर (स्कील एज्युकेशन), अकाउंट्स ऑफिसर, सुप्रीटेंडेंट, ज्युनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर, ज्युनिअर अकाउंटंट, ज्युनिअर असिस्टंट अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.

जर तुम्ही संबंधित क्षेत्रात शिक्षण घेतले असेल तर ही चांगली संधी आहे. तुम्हाला शिक्षक, प्रोफेसर म्हणून नोकरी करायची असेल कर चांगल्या संंस्थेत तुम्हाला काम करता येणार आहे. या नोकरीच्या अनुभवामुळे तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. भविष्यात या संधीमुळे तुम्हाला खूप फायदा होईल.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला cbse.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

यानंतर होमपेजवर तुम्हाला भरतीसंबंधित लिंक दिसणार आहे. त्यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे. यानंतर लॉग इन करावे.

यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये सर्व माहिती भरायची आहे.

यानंतर फॉर्म सबमिट करावी. या फॉर्मची एक प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पैशांसाठी ढसाढसा रडला, उत्तर प्रदेशच्या तरुणाने पुण्यात स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला

Maharashtra News Live Update: चिपळुणातील गांधारेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी

नागपंचमीचा उपवास भावासाठी का करायचा? कारण तुम्हाला माहिती असायला पाहिजे

Gen Alpha Club : रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता? भिवंडीच्या मुलींचा संतप्त सवाल; व्हिडिओ तुफान व्हायरल

Heart Attack : सकाळी केलेली 'ही' छोटी चूक वाढवते हार्ट अटॅकचा धोका, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT