Government Job Google
naukri-job-news

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य विभागात भरती; ३९००० पेक्षा जास्त मिळणार पगार

Government Job Recruitment: सरकारी नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जर तुमचेही सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर आरोग्य विभागात भरती सुरु आहे. तुम्ही या पदांसाठी अर्ज करु शकतात.

Siddhi Hande

आरोग्य विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बिहार लोकसेवा आयोग (BPSC) ने आरोग्या विभागाच्या अंतर्गत वैद्यकीय रुग्णालये आणि विद्यापीठात असिस्टंट प्राध्यापक पदांसाठी भरती करणार आहे. आरोग्य विभागात काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकतात. ही अर्जप्रक्रिया २५ जूनपासून सुरु झाली आहे.

BPSC च्या भरतीसामध्ये एकूण १३९९ पदे भरली जाणार आहे. या पदांसाठी तुम्ही २६ जुलै किंवा त्यापूर्वी अर्ज करु शकतात. या जागांसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा आहे. अनारक्षित प्रवर्गातील म्हणजे सामान्य प्रवर्गातील लोकांसाठी वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. मागासवर्गीय गटातील (पुरुष आणि महिला)साठी ४८ वर्ष वयोमर्यादा आहे तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा आहे. तर बिहारच्या राज्य आरोग्य सेवा अंतर्गत कार्यरत डॉक्टरांसाठी वयोमर्यादा ५० वर्ष आहे.

अर्ज करण्यासाठी शुल्क

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्ग, OBCआणि EWS श्रेणीसाठी ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWD/ महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २२५ रुपये आहे.

BPSC अंतर्गत पदांसाठी निवडलेल्या उमेदवाराला १५६०० ते ३९,१०० रुपये पगार दिला जाईल. याची माहिती अधिकृत वेबसाइटवर दिलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT