मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस भरती १९ जूनपासून सुरु होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील १७ हजार ४७१ जागांसाठी एकूण १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज करण्यात आले आहेत. दुसरीकडे कारागृहातील पदासाठीही १ हजार ८०० पदांसाठी भरती होत आहे. या जागांसाठी तीन लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. दरम्यान, १९ जूनपासून पोलीस भरती सुरु होणार आहे.
राज्यातील महाराष्ट्र पोलीस भरतीला १९ जूनपासून सुरुवात होणार आहे. राज्यातील पोलीस दलात १७ हजार ४७१ जागांसाठी भरती होणार आहे. या जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज आले आहेत. बँड्समन पदासाठी ४१ जागा उपलब्ध आहेत. या पदासाठीही ३२ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत.
कारागृह विभागातील शिपाई या एका पदासाठी २०७ अर्ज करण्यात आले आहेत. चालक पदासाठी १६८९ जागांसाठी १ लाखांहून अधिक अर्ज करण्यात आले आहेत. पोलीस शिपाईच्या ९५९५ जागांसाठी ८ लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. अर्जदारांमध्ये ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, राज्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या पोलीस भरती पुढे ढकलावली, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. राज्यातील पावसामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तर पावसामुळे अनेक उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे पोलीस भरती पुढे ढकलावी, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस भरतीत २०७ जागांसाठी भरती होणार आहे. या जागांसाठी एकूण २७ हजार ९८१ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तर अमरावती पोलिसांच्या ७४ जागांसाठी ४ हजार ७८९ अर्ज आले आहेत. शहर आणि ग्रामीण अशा एकूण २८१ जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. यासाठी एकूण ३२ हजार ७७० अर्ज आले आहेत.
दरम्यान, पावासामुळे कोणत्याही उमेदवारांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. पोलिसाच्या नोकरीसाठी कोणत्याही आमिषाला बळू पडू नये. त्यामुळे उमेदवारांची सर्व व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.