Bombay High Court Job Saam Tv
naukri-job-news

Bombay High Court Job: ७वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! बॉम्बे हाय कोर्टात सरकारी नोकरीची संधी; आजच करा अर्ज

Bombay High Court Recruitment: मुंबई उच्च न्यायालयात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बॉम्बे हाय कोर्टात स्वयंपाकी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. मुंबई उच्च न्यायलयात नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. बॉम्बे हाय कोर्टाच्या मूख्य शाखेच्या आस्थापनेवरील पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. ही जाहीर मुंबई उच्च न्यायालयाने प्रकाशित केली आहे. या नोकरीसाठी इच्छुरांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बॉम्बे हाय कोर्टातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ७वी/१०वी / १२वी पास असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही अधिसूचना वाचावी. त्यानंतरच अर्ज करावेत.

मुंबई उच्च न्यायलयात सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. राज्य सरकारच्या मान्यतेने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्वयंपाकी-नि-शिपाई या पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे.त्यासाठी तुम्ही किमान ७वी पास असणे गरेजेचे आहे.

या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला १६,६०० ते ५२,४०० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी सातवी पास असावे. उमेदवाराला मराठी भाषा लिहता, बोलता आणि वाचता यावी. तसेच मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

मुंबई उच्च न्यायालयातील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणीद्वारे केली जाणार आहे. यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ३०० रुपय शुल्क भरावे लागणार आहे. तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. २१ सप्टेंबर अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे. मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला,P.W.D इमारत, फोर्ट, मुंबई ४०००३२ येथे अर्ज पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी २.३० पर्यंत स्थगित

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

Rahul Gandhi speech : "अमित शाह यांनीच गोळीबाराचा आदेश दिला," राहुल गांधींचा थेट आरोप; रिजिजू म्हणाले माफी मागा, नाहीतर...

महिनाभर रोज एक बदाम खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील?

SCROLL FOR NEXT