Oil India Recruitment: ऑइल इंडियामध्ये सरकारी नोकरीची संधी अन् १.६० लाख रुपये पगार; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oil India Recruitment 2025: ऑइल इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. ऑइल इंडियामध्ये ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठा तुम्हाला भरघोस पगार मिळणार आहे.
Oil India Jobs
Oil India JobsSaam Tv
Published On

सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी तरुणांकडे आहे. ऑइल इंडियामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. ऑइल इंडियामध्ये ग्रेड ए,ग्रेड बी आणि ग्रेड सी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. १०० पेक्षा अधिक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Oil India Recruitment)

Oil India Jobs
Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ३६८ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

ऑइल इंडियामधील या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या भरती मोहिमेत एकूण १०२ पदे भरती केली जाणार आहे. सुपरिटेंडेंट इंजिनियरसाठी ३ पदे रिक्त आहेत. सिनियर ऑफिसर पदांसाठी ९७ पदे रिक्त आहेत. तर कॉन्फेडिंशियल सेक्रेटरीसाठी १ जागा रिक्त आहे. हिंदी ऑफिसर या पदासाठीही १ जागा रिक्त आहे. त्यामुळे विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. उमेदवारांकडे इंजिनियरिंग,फायनान्स,एचआर, आयटी, लॉ किंवा जिओलॉजीमध्ये बॅचलर किंवा मास्टर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच काही पदांसाठी आयसीएआय, आयसीएसआय, एमबीए किंवा पीजीडीएम डिग्री प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी ग्रेड सी पदांसाठी वयोमर्यादा ३७ वर्षे असावे. ग्रेड बी पदांसाठी ३४ वर्षे आणि ग्रेड ए पदांसाठी ४२ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आला आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.

Oil India Jobs
Bank Jobs: पंजाब अँड सिंध बँकेत ऑफिसर होण्याची संधी; अर्ज कुठे आणि कसा करावा?

पगार (Salary)

ग्रेड ए पदांसाठी निवड झाल्यावर ५० हजार ते १.६ लाख रुपये पगार मिळणार आहे. ग्रेड बी पदांसाठी ६० हजार ते १.८ लाख रुपये पगार मिळणार आहे. ग्रेड सी पदांसाठी उमेदवारांनी ८० हजार ते २.२ लाख रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्ते आणि सुविधादेखील मिळणार आहेत.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे केली जाणार आहे.

Oil India Jobs
Bank Of Baroda Jobs: ७वी आणि १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; बँक ऑफ बडोदामध्ये भरती सुरु; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com