
यूनियन बँकेत नोकरीची संधी
वेल्थ मॅनेजर पदांसाठी भरती सुरु
अर्ज करण्याची शेवटची तारीख
बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणार्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूनियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. यूनियन बँक ऑफ इंडियाने नवीन भरती जाहीर केली आहे. यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुकांनी आधी अधिसूचना वाचा त्यानंतर अर्ज करावेत.
यूनियन बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी तुम्ही unionbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
यूनियन बँकेत वेल्थ मॅनेजर पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया कालपासून म्हणजेच ५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२५ आहे. (Union Bank Recruitment)
यूनियन बँकेत वेल्थ मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला बेसिक सॅलरी ६४,८२० रुपये मिळणार आहे. त्यानंतर पहिल्या वर्षी वेतनवाढ होईल. यानंतर तुमचा पगार ६७,१६० रुपये होईल.
यूनियन बँकेतील या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, अर्जाची स्क्रिनिंग किंवा इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.या नोकरीसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये भरती होणार आहे.
यूनियन बँकेत वेल्थ मॅनेजर पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए/एमएमएस / पीजीडीबीएम / पीजीपीएम / पीजीडीएममध्ये रेग्युलर डिग्री किंवा कोर्स केलेला असावा.
अर्ज कसा करावा ?
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला सर्वात आधी www.unionbankofindia.co.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तेथील रिक्रुटमेंट या ऑप्शनवर क्लिक करा. त्यातील RECRUITMENT OF WEALTH MANAGERS (SPECIALIST OFFICERS) यावर क्लिक करा.
यानंतर ऑनलाइन अप्लाय वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन करा.
यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड दिसेल.
यानंतर तुम्हाला फॉर्म पूर्ण भरायचा आहे.
तुमचा फोटो आणि सही अपलोड करायची आहे. यानंतर तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर सबमिट करायचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.