SBI Recruitment: स्टेट बँकेत सरकारी नोकरीची संधी, ५१८० पदांसाठी भरती जाहीर; आजच अर्ज करा

SBI Clerk Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. स्टेट बँकेत ५१८० पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.
SBI Recruitment
SBI RecruitmentSaam Tv
Published On

बँकेत काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता स्टेट बँकेचे क्लर्क पदासाठीचे नोटिफिकेशन जारी झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरती जाहीर केली आहे. स्टेट बँकेत ज्युनिअर असोसिएट होण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. (SBI Clerk Recruitment)

SBI Recruitment
Government Jobs: दहावी उत्तीर्ण असाल तरी नौदलात मिळेल नोकरी; जाणून घ्या पगार अन् अर्ज प्रक्रिया

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५१८० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ज्युनिअस असोसिएट (सेल्स अँड कस्टमर सपोर्ट) (SBI Junior Associate Recruitment)पदासाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२५ असणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी पुढच्या २० दिवसांत अर्ज करावेत.

पात्रता (SBI Clerk Eligibility)

ज्युनिअर असोसिएट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २० ते २८ वर्षे असावी.

राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. एससी-एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सुट दिली आहे.

SBI Recruitment
Job Opportunities: सुवर्णसंधी! दोन वर्षात ३.५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार

निवडप्रक्रिया

या नोकरीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे होणार आहे. उमेदवारांना प्रिलियम्स परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा टेस्ट द्यावी लागणार आहे.प्रिलियम्समध्ये इंग्रजी, न्युमेरिकल अॅबिलिटी आणि रिजनिंग विषय असणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावरच तुम्हाला मुख्य परीक्षा देता येणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

SBI Recruitment
JKSSB Recruitment: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी; महिन्याला मिळेल बक्कळ पगार, कुठे कसा कराल अर्ज?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com