JKSSB Recruitment: वैद्यकीय क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी; महिन्याला मिळेल बक्कळ पगार, कुठे कसा कराल अर्ज?

Medical Technical Departments Announced : JKSSB ने तांत्रिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवार ५ ऑगस्टपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Government Job
Government JobSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. वैद्यकीय किंवा तांत्रिक क्षेत्राशी संबंधित तुमचं शिक्षण असेल तर तुमचं नशीब पालटणार आहे. कारण जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळाने (JKSSB) २०२५मध्ये विविध विभागांमधील रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केलीय.

Government Job
Tractor Subsidy Scheme: अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दारी येणार ट्रॅक्टर; सरकार देणार ४०% अनुदान, जाणून घ्या योजनेची A To Z माहिती

अर्ज प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरू शकतील. उमेदवार येथे दिलेल्या पद्धतीद्वारे देखील अर्ज करू शकतात. वाचक मित्रांनो जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळाने नियुक्त केलेल्या वेळेच्या मर्यादेत भरतीसाठी अर्ज करावा. भरतीअंतर्गत, स्टाफ नर्स, ज्युनियर फार्मासिस्ट, एएनएम, लॅब असिस्टंट, फूड सेफ्टी ऑफिसर, इलेक्ट्रिशियन, ज्युनियर रेडिओग्राफर आणि ज्युनियर सर्जिकल असिस्टंट यासारख्या पदांवर नियुक्त्या केल्या जातील. ही पदे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न आणि औषध विभाग यासह इतर विभागांमध्ये पदे भरली जाणार आहेत.

Government Job
BSNLची खास ऑफर! 1 रुपयात काय येतं? 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

किती मिळेल पगार?

या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १९९०० ते ८११०० रुपयांपर्यंत पगार मिळेल. पदाच्या ग्रेड पे आणि पातळीनुसार वेतन दिले जाणार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या नियमांनुसार डीए, एचआरए आणि इतर भत्तेही दिले जातील.

पात्रता काय?

स्टाफ नर्स: जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) किंवा बी.एससी नर्सिंग उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

ज्युनियर फार्मासिस्ट: फार्मसीमध्ये डिप्लोमाचं शिक्षण घेतलेलं असावं.

एएनएम: एएनएम अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले उमेदवारच पात्र आहेत.

लॅब असिस्टंट/रेडिओग्राफर/टेक्निशियन: संबंधित क्षेत्रात डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी: अन्न तंत्रज्ञान, दुग्ध तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान किंवा फार्मसी यासारख्या कोणत्याही मान्यता प्राप्त विषयात पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे.

उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे असावे. राखीव श्रेणींना नियमांनुसार वयात सूट मिळेल.

कशी होणार निवड प्रक्रिया?

लेखी परीक्षा घेतली जाईल. काही तांत्रिक पदांसाठी कौशल्य चाचणी देखील असू शकते. त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. स्टाफ नर्स, ज्युनियर फार्मासिस्ट, एएनएम, लॅब असिस्टंट, फूड सेफ्टी ऑफिसर, इलेक्ट्रिशियन, ज्युनियर रेडिओग्राफर आणि ज्युनियर सर्जिकल असिस्टंट यासाखरख्या पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com