MHADA Scheme : स्वस्त घराची संधी! ३१ ऑगस्टपर्यंत म्हाडा घरांसाठी अर्ज करा, सविस्तर प्रक्रिया जाणून घ्या

MHADA Lottery 2025 : छत्रपती संभाजीनगर म्हाडा लॉटरी २०२५ अंतर्गत १४०८ घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. प्रधानमंत्री आवास योजनेतून अनुदान. शेवटची तारीख: ३१ ऑगस्ट. लॉटरी सोडत: २६ सप्टेंबर.
Chhatrapati Sambhajinagar MHADA Housing Lottery 2025
MHADA Scheme Saam TV News Marathi
Published On

छत्रपती संभाजीनगर म्हाडातर्फे सोडत जुन २०२५ अंतर्गत १३४१ निवासी सदनिका व नाशिक मंडळातील ६७ सदनिका मिळून एकूण १४०८ सदनिकांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अर्जदारांना अनामत रक्कम भरून ऑनलाईन अर्ज https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावरून सादर करता येईल. या अर्जांची लॉटरी २६ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जाहीर करण्यात येणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar MHADA Housing Lottery 2025
2025 Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना तीन गाठी बांधा, भावाचे भविष्य होईल उज्वल

या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचा समावेश असून नक्षत्रवाडीतील १०५६ आणि अंबाजोगाईतील ९२ सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखीव आहेत. या योजनांमध्ये रु. २.५० लाखांचे अनुदान मिळणार असून त्यामुळे रु. १० ते १२.५ लाखांमध्ये १ बीएचके सदनिकेची संधी उपलब्ध झाली आहे. या घरांचा ताबा डिसेंबर २०२६ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे.

तसेच, शहराच्या मध्यवर्ती चिकलठाणा परिसरातील १५४ सदनिका देखील या सोडतीत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ही घरे जालना रोडपासून जवळ असून रु. २७ ते ३४ लाखांच्या दरात २ बीएचके सदनिका घेण्याची संधी आहे. या घरांचा ताबा डिसेंबर २०२५ पर्यंत मिळणार आहे.

शासनाच्या २० टक्के सर्वसमावेशक योजनेतून बीड बायपास, सातारा परिसर आणि देवळाई येथील २१ सदनिका आणि १८ भुखंड देखील देण्यात येणार आहेत. त्यातील सदनिकांची किंमत अंदाजे १५ लाख असून भुखंड ५ लाखांपर्यंत उपलब्ध होतील.

म्हाडाच्या ई-ऑक्शनमधून मराठवाड्यातील ५२ अनिवासी भुखंडांवर प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ११५ अर्जदारांनी सहभाग घेतला आहे. लवकरच या लिलावाची प्रक्रिया ऑनलाईन पार पडणार आहे. अर्जासंबंधी मदतीसाठी म्हाडाकडून हेल्पलाइन क्रमांक आणि मदत कक्ष देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar MHADA Housing Lottery 2025
Freshers Job Hiring : IT फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी! इन्फोसिसकडून २०,००० पदांसाठी भरती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com