Bank Of Baroda Recruitment Saam Tv
naukri-job-news

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

BOB Recruitment 2026: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ग्रुप हेड, टेरिटरी हेड आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी

ग्रुप हेड, टेरिटरी हेड आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती

अर्ज कसा करावा?

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदात ग्रुप हेड, टेरिटरी हेड आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. २७ मार्च ते १६ एप्रिल या कालावधीत तुम्हाला अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत डिग्री किंवा मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केलेला असावा. या नोकरीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा पदानुसार निश्चित करण्यात आली आहे.उमेदवारांचे वय २४ ते ४५ असावे. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये फी भरायची आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया कशी असणार आहे याबाबत उद्या माहिती मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी उद्यापासून अर्ज करावेत.

बँक ऑफ बडोदा ही सरकारी बँक आहे. या बँकेत काम करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. भविष्यात या कामाच्या अनुभवाचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. करिअरच्या दृष्टीने ही नोकरीची संधी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे चांगल्या बँकेत काम करायला तुम्हाला मिळणार आहे. इच्छुकांनी या मोकरीसाठी अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

Accident: भाविकांवर काळाचा घाला! ट्रक अन् कारची समोरासमोर धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू

Power Cut : पावसाळ्यामुळे घरात लाईट वारंवार जाते? तर 'हे Smart Gadgets' ठरतील उपयोगी

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

SCROLL FOR NEXT