BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महानगरपालिकेत सध्या स्टाफ नर्स पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी

स्टाफ नर्स पदासाठी भरती

पगार ३०,००० रुपये

सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेत (BMC) सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत स्टाफ नर्स पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भरती मोहिमेअंतर्गत २ जागांवर भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. (BMC Recruitment)

शैक्षणिक पात्रता (BMC Recruitment Eligibility)

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास केलेली असावी. याचसोबत जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी डिप्लोमा केलेला असावा. उमेदवार हा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलद्वारे नोंदणीकृत असावा. तसेच मराठी विषयात उत्तीर्ण असावे. त्याच्याकडे संगणक प्रशिक्षणाचे (MS CIT,DOEACC) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना आपला अर्ज ७ नोव्हेंबरपर्यंत पाठवायचा आहे. इच्छुकांनी अर्ज दुसरा मजला, श्रीम. दि. मो, माँ सर्व सा. रुग्णालय चेंबूर येथे पाठवायचा आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर दिलेली माहिती वाचावी. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला चांगला पगार मिळणार आहे.

सार्वजनिक विभागात हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नर्सिंगचा कोर्स केला असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. या संधीचं सोनं करा आणि लगेच तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT