BMC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: खुशखबर! बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ५०,००० रुपये; आजच अर्ज करा

BMC Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी

  • १९ पदांसाठी भरती जाहीर

  • कंत्राटी पद्धतीने होणार आहे भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाकरिता हा भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव येथे ही भरती केली जाणार आहे. याबाबत माहिती https://portal.mcgm.gov.in/For

prospects/Careers-All या वेबसाइटवर देण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे.

ही भरती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑडिओलॉजीसह स्पीच थेरपिस्ट,स्पीच थेरपीस्ट-सी ऑडिओलॉजिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ई.सी.जी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. याचसोबत नेत्रतज्ज्ञ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

पात्रता

एकूण १९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट पदासाठी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. ऑडिओलॉजी सह स्पीच थेरपिस्ट पदासाठी ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. ई.सी.जी टेक्निशियन पदासाठी विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याचसोबत कार्डिओ टेक्नोलॉजीमध्ये बीएस.सी केलेले असावे. न्युरोलॉजी टेक्निशियन पदावासाठी बी.पी.एम,टीअंतर्गत पदवी प्राप्त केलेली असावी. लॅब टेक्निशियन पदासाठी बी.एससी पॅरामेडिकल टेक्नोलॉजीसह इंटर्नशिप केलेली असावी.

या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. १ऑगस्ट २०२५ पर्यंत हा अर्ज एल.टी.एमएस. रुग्णालयाचा आवक विभाग येथे पोहचणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २०,००० ते ५०,००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नांदेडमधील महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचा दौरा पुढे ढकलला

Kantara Chapter 1 Trailer Out: रहस्यमयी अन् गूढ कहाणी; अंगावर शहारे आणणारा 'कांतारा चॅप्टर 1'चा ट्रेलर पाहिला का?

Tuesday Horoscope : तुमच्या जवळच्या लोकांना प्रगती बघवणार नाही; ५ राशींच्या लोकांना रागावर नियंत्रण ठेवावे लागणार

Gujrat Viral News: पोलिसांच्या व्हॅनवर १० मिनिटे अश्लील चाळे, गर्लफ्रेंड अन् बॉयफ्रेंडचा नको 'तो' प्रकार, Video होतोय व्हायरल

Kalyan APMC Market : कल्याणमध्ये घोटाळ्याचा बाजार; समितीत आजी-माजी संचालकांच्या नातेवाईकांचा भरणा

SCROLL FOR NEXT