BMC Recruitment: Saam Tv
naukri-job-news

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत तब्बल १८४६ जागांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

BMC Job Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक पदासाठी भरती सुरु आहे. १८४६ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदासाठी भरती जाहीर केली होती. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ झाली आहे. आता तुम्ही ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध खात्यात गट क म्हणजेच ग्रुप सी मधील कार्यकारी सहायक पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. १८४६ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याचा शेवटची तारीख ९ सप्टेंबर होती. मात्र, ही मुदत वाढवून ३१ ऑक्टोबर केली आहे. या नोकरीसाठी अजूनही उमेदवार अर्ज करु शकतात. ज्यांनी याआधी अर्ज केले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.

ग्रुप सी कार्यकारी सहायक पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यामध्ये विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. या नोकरीसाठी १०वी पास ते मान्यतप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर झालेले उमेदवार अर्ज करु शकतात.तसेच त्यांच्याकडे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाणपत्र असायला हवे.

१८ ते ३८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड परिक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हाला ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे. मराठी भाषा व्याकरण, सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा व व्याकरण, बौद्धिक चाचणी यासंबंधित परीक्षा होणार आहे.

या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना १००० रुपये शुल्क भरावे लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

SCROLL FOR NEXT