Thane : विधानसभेआधी मराठा समाज आक्रमक, ठाण्यात ४ उमेदवार देणार!

Thane Vidhan Sabha Election : ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघात महायुती आणि मविआचं टेन्शन वाढलं आहे.
Grampanchayat election
Grampanchayat electionsaam tv
Published On

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीआधी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं समोर आलेय. मराठा क्रांती मोर्चा ठाण्यातील चार विधानसभा जागांवर आपला उमेदवार उतरवणार आहे. मराठा क्रांती मार्चाचे ठाण्यातील संयोजक संतोष सूर्यराव आणि प्रवीण पिसाळ यांनी विधानसभेची तयारी केली आहे.

मराठा संघटना सदस्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. संयोजक संतोष पालांडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, "आम्ही राजकीय पक्षांना आदर्श उमेदवार जाहीर करण्यासाठी वाजवी वेळ देऊ शकतो. अन्यथा, आम्ही आमच्याच उमेदवाराला धक्का देऊ."

राज्यातील सर्वच राजकीय पक्षाची मराठा समाजाबाबत असलेली उदासीनता आहे. ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाची मोठी ताकद आहे. आगमी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील चारही विधानसभा श्रेत्रात मराठा उमेदवार देणार असल्याची घोषणा रविवारी मराठा क्रांती मोर्चाने केली. ठाण्यात विधानसभा क्षेत्रात मराठा जोडो अभियान सुरू केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

Grampanchayat election
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत वादाचे फटाके, ३८ जागांवर उडाली ठिणगी, आपापसातच लढणार?

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर आणि मराठा समाज याचा फटका अनेक सत्ताधारी उमेदवारांना बसला होता. विरोधकांना फायदा झाल्याचा दावाही यावेळी कऱण्यात आला होता. आता विधानसभेला मराठा समाजाच्या मतांना महत्व आलेय. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. त्यातच आता मराठा क्रांती मोर्चाने आपला उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील चारही विधानसभा मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चाचे उमेदवार उतरवले जाणार आहेत.

Grampanchayat election
Maharashtra Politics : पुण्यातील ११ विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा; शिंदेंच्या शिवसेनेचंही तगडं प्लानिंग

अनेक वर्षांपासून सुर असलेला मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा समाज आक्रमक झाला आहे. ठाण्यात सकल मराठा समाजाच्या बैठकांना वेग आलाय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने रविवारी ठाणे शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीदरम्यान,मराठा क्रांती मोर्चा आपल्या मागण्यांसाठी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवणार नसून 'मराठा पॅटर्न' राबविणार असल्याचे सांगितले.

ठाण्यात कोणत्या विधानसभा मतदारसंघात मराठा मतदार किती ?

ठाणे विधानसभा मतदारसंघात १ लाख ३५ हजार, ओवळा- माजिवडा मतदारसंघात १ लाख ५० हजार, कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघात ८० हजार आणि कळवा- मुंब्रा मतदारसंघात ३५ हजार मराठा मतदार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com