Maharashtra Politics : पुण्यातील ११ विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा; शिंदेंच्या शिवसेनेचंही तगडं प्लानिंग

Pune District Assembly : महायुतीत जागावाटपावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. पुण्यातील तब्बल ११ विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केला आहे.
 Maharashtra Politics Ajit Pawar EKnath Shinde
Maharashtra Politics Ajit Pawar EKnath Shinde saam tv
Published On

लोकसभेचा गुलाल खाली पडताच राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. केंद्रीय निवडणुक आयोगाचे पथक पाहणी करून गेल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरून बैठकांचा धडाका सुरु आहे. अशातच महायुतीत जागावाटपावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. पुण्यातील तब्बल ११ विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाने दावा केला आहे.

 Maharashtra Politics Ajit Pawar EKnath Shinde
Shivsena News : बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हरपला; ठाकरे गटाच्या माजी आमदाराचे निधन

तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील विधानसभेच्या जागांसाठी तगडं प्लानिंग सुरु केलं आहे. शिंदेंचे शिवसैनिक पुण्यात निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागा आहेत. यातील ८ विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या ताब्यात आहेत. तर ८ जागांवर भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत. उर्वरित जागांवर काँग्रेस आणि शरद पवार गटाचे आमदार आहेत.

दरम्यान, आगामी विधानसभेत पुण्यातील २१ जागांपैकी ११ जागा आपल्याला मिळाव्यात, अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे. यात बारामती, इंदापूर , जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ आणि शिरूर या जागांचा समावेश आहे. याशिवाय दौंड, पुरंदर हवेली आणि भोर मतदारसंघावर देखील अजित पवार गटाने दावा केला आहे.

त्यामुळे जागावाटपात अजित पवार यांच्या वाट्याला किती जागा येणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाने देखील पुणे जिल्ह्यात विधानसभेची तयारी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक जागा लढवण्यासाठी भाजप आग्रही आहे.

यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून देखील पुण्यात विधानसभेची तयारी सुरु करण्यात आली आहे. शहरातील गुडलक चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे कट आउट लावण्यात आले आहे.

तब्बल 50 फुटांचं हे कटआउट असून यात सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री कॉमन मॅन एकनाथ शिंदे असा मजकूर छापण्यात आला आहे. कर्तव्यदक्ष ,मेहनती, प्रामाणिक, दिवस-रात्र काम करणारा, कॉमन मॅन असा उल्लेखही या कटआउटवर करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील विधानसभेच्या २१ जागांवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

 Maharashtra Politics Ajit Pawar EKnath Shinde
Badlapur Case : हायकोर्टाने ताशेरे ओढताच २४ तासांतच अटक; बदलापुरातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात कसे फसले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com